तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे - अजित पवार - Ajit Pawar Appeal To Punekar - AJIT PAWAR APPEAL TO PUNEKAR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 24, 2024, 5:25 PM IST
पुणे Lok Sabha election 2024 : राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. दोन्ही पवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आता होऊ लागले आहेत. अजित पवार हे काल रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. यावेळी त्यांनी माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे पालिका, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, राज्य सरकारचा निधी आहे आणि मग माझी पण जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायको घरी म्हणाली, "ए हे काम करून दे तर सकाळी मला करून द्यावेच लागणार आहे. नाहीतर माझं काही खरं नाही", असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. पाहूया...