हैदराबाद नवीन Xiaomi YU7 इलेक्ट्रिक SUV : Xiaomi कंपनी जून किंवा जुलै 2025 पर्यंत YU7 इलेक्ट्रिक SUV चीनमध्ये लॉंच करण्याची शक्यता आहे. यामुळं Xiaomi YU7 ची चीनच्या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या टेस्ला मॉडेल Y शी थेट स्पर्धा होणार आहे. याआधी, कंपनीनं देशांतर्गत बाजारात SUV7 लाँच केली होती. कंपनीच्या या SUV7 नं आकर्षक किंमतीसह मजबूत लूकनं ग्राहकांची मनं जिंकली होती.
नवीन Xiaomi YU7 इलेक्ट्रिक SUV : चीनची टेक जायंट कंपनी Xiaomi आता वाहन उत्पादक कंपनी बनली आहे. तिची पहिली कारही स्थानिक बाजारात सुपरहिट झाली आहे. Xiaomi नं आता YU7 नावाची पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याची घोषणा केलीय. कंपनी जून किंवा जुलै 2025 पर्यंत ही नवीन कार चीनमध्ये लॉंच करू शकते. Xiaomi YU7 चीनच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या Tesla मॉडेल Y शी थेट स्पर्धा करेल. याआधी, कंपनीनं देशांतर्गत बाजारात SUV7 लाँच केली होती.
SU7 सह पाहिले U7 : Xiaomi नं अलीकडेच नवीन इलेक्ट्रिक SUV चं सादारीकरण केलं आहे. ज्याचा फोटो ब्रँडच्या पहिल्या कार SU7 सोबत शेअर करण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक कारचं उत्पादन कंपनीच्या बीजिंगमधील यिझुआंग जिल्ह्यात करणार आहे. चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात होमोलोगेशन फाइलिंग दरम्यान या कारचे अंतिम तपशील समोर आले आहेत.
दिसायला जवळजवळ सारखेच : नवीन YU7 SUV लुक आणि स्टाइलमध्ये जवळपास SU7 सेडानसारखीच आहे. त्याचा चेहरा, एलईडी हेडलॅम्प आणि बंपर देखील सारखं दिसतंय. जरी इलेक्ट्रिक SUV मध्ये SU7 पेक्षा जास्त एअर इंटेक आहेत. या कारचं साइड प्रोफाइल समान आहे.
SUV मध्ये काय आहे खास ? : Xiaomi नं उत्कृष्ट डिझाइनसह नवीन इलेक्ट्रिक SUVमध्ये अप्रतिम चाकं दिली आहेत. ज्यामुळं ती अधिक स्टायलिश दिसते. याशिवाय SUV च्या मागील बाजूस SU7 प्रमाणे LED टेललॅम्प बसवण्यात आले आहेत. एकंदरीत, नवीन Xiaomi YU7 खूप सुंदर दिसत आहे. यासह, कंपनी खूप उच्च वैशिष्ट्ये प्रदान करणार आहे.
253 किमी/ताशी टॉप स्पीड : कंपनीनं अद्याप Xiaomi YU7 चं पॉवर आणि बॅटरी पॅक तपशील उघड केलेले नाहीत. तथापि, याचा टॉप स्पीड २५३ किमी/तास असेल, असं सांगण्यात आले आहे.
हे वाचलंत का :