हैदराबाद Xiaomi Black Friday sale : Xiaomi नं त्याचा प्रमोशनल ब्लॅक फ्रायडे सेल इव्हेंट सुरू केला आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, वायरलेस इअरबड्स, आणि स्मार्ट होम डिव्हाइसेससह अनेक प्रकारच्या उपकरणांवर 65 टक्के पर्यंत प्रचंड सूट दिली जात आहे. जर तुम्ही स्वत:साठी स्मार्टफोन किंवा स्मार्ट गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सेल तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ब्लॅक फ्रायडे सेल ग्राहकांसाठी एक उत्तम संधी आहे. Xiaomi चा ब्लॅक फ्रायडे सेल मर्यादित काळासाठी आहे. त्यामुळं विक्रीमध्ये उपलब्ध असलेल्या डिव्हाइसेसची ऑफर, सवलत आणि वैशिष्ट्ये आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत..
स्मार्टफोन डील : Redmi Note 13 Pro आणि Xiaomi 14 Civic सारखी लोकप्रिय मॉडेल्स ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत. Redmi Note 13 Pro सेलमध्ये एक्स्चेंज बोनससह उपलब्ध आहे आणि 9,000 रुपयांपर्यंत सूट आहे, त्याची सुरुवातीची किंमत 19 हजार 999 रुपयांपर्यंत खाली कमी झाली आहे. Xiaomi 14Civici मध्ये एक्सचेंज बोनस आणि 15 हजारांच्या मोठ्या सवलतीसह देखील येतो. या फोनची मुळ किंमत 39 हजार 999 पर्यंत आहे. तुम्ही Xiaomi च्या वेबसाईटवर जाणून सर्व तपाशिल तपासू शकता.
Xiaomi स्मार्ट टीव्ही डील : Xiaomi च्या ब्लॅक फ्रायडे सेलचा विस्तार त्याच्या स्मार्ट टीव्हीच्या लाइनअपपर्यंत आहे. Xiaomi Smart TV X Pro QLED Series 43 वर 21 हजार रुपयांची मोठी सूट मिळत आहे, तर Xiaomi Smart TV X Series 50 (2024 Edition) वर 21 हजार 250 रुपयांची सूट मिळत आहे.
Redmi Buds : Redmi Buds वर सूट दिली आहे. Redmi Buds 5 earbuds Rs 2 हजार 300 च्या सवलतीत उपलब्ध आहेत, तर Redmi Buds 5C 3 हजरा 200 च्या सवलतीत उपलब्ध आहेत. फिटनेस प्रेमींना Rs 3 हजार 400 च्या सवलतीत Redmi Watch 5 Lite किंवा Rs 2 हजार 200 च्या सवलतीत Redmi Watch 5 Active मिळू शकते.
स्मार्ट होम आणि ॲक्सेसरीज : Xiaomi चे स्मार्ट होम इकोसिस्टम देखील ब्लॅक फ्रायडे सेलचा एक भाग आहे. Xiaomi रोबोट व्हॅक्यूम क्लीनर X10 35 हजार रुपयांच्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. इतर उल्लेखनीय सवलतीमध्ये Xiaomi हँडहेल्ड गारमेंट स्टीमर, Xiaomi 360-डिग्री होम सिक्युरिटी कॅमेरा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या विविध पॉवर बँकांचा समावेश आहे.
हे वाचंलत का :