हैदराबाद Why Male Honeybee Die After Mating : मधमाशांत 'नर' मधमाशीची भूमिका साधी, पण दुःखद असते. मिलन (Sex) झाल्यानंतर लगेच तिच्या वाट्याला मत्यू का येतो? जगभरातील मधमाशांत (Honeybees) आढळणारी ही विलक्षण घटना आहे. जगात काही प्रजाती पुनरुत्पादनासाठी किती मोठा त्याग करतात, हे यावरून स्पष्ट होतंय. अमृत गोळा करणं, पोळ्याचं रक्षण करणं, पिल्लांचं पालनपोषण करणं, असं मादी मधमाशीचं काम असतं. मादी सहकाऱ्यांप्रमाणेच, नर मधमाशींचं पुनरुत्पादन एक प्राथमिक काम असंत. पण, हे कर्तव्य पार पाडताना नर मधमाशींचा दुर्दैवी, जीवघेणा अंत होतो. त्यामुळं नर मधमाशी (Honeybees) संभोगानंतर का मरते?, याबद्दल अनेकांना माहिती नसेल. आज आपण या रहस्यमय घटनेमागील सत्य जाणून घेणार आहोत.
मधमाशांचं जीवन : नर मधमाशी, इतर मधमाशांच्या तुलनेत आरामाचं जीवन जगते. त्यांना फुलांचा रस गोळा करून मध तयार करावं लागत नाही. घुसखोरांपासून पोळ्याचं रक्षण करणं, हे नर मधमाशींच काम असतं. या नर मधमाशींचं पालन-पोषण माद्या माशांनाच करावं लागतं. नर मधमाशा आयुष्यभर अन्नासाठी त्यांच्यावर अवलंबून असतात. नर मधमाशा इतर माशांच्या तुलनेत मोठ्या असतात. त्यांचं शरीर देखील अधिक मजबूत असतं. त्यांचं प्राथमिक काम पुनरुत्पादन करणं तसंच राणी मधमाशांशी मिलन (Sex) करणं असतं.
आकाशात उंचावर होतं मिलन : पोळ्यातील राणी मधमाशीनं अंडी तयार करण्यासाठी सोबती करणं आवश्यक असंत. एकदा मधमाशी परिपक्व झाल्यावर, ती "न्युपशिअल फ्लाइट" म्हणून ओळखला जाणारा प्रवास सुरू करतं. या दरम्यान ती वेगवेगळ्या पोळ्यामधील अनेक नर मधमाशींसोबत संभोग करते. ही प्रक्रिया अनेक वेळा आकाशात उंचावर होते. त्यानंतर नर मधमाशीचा अंत होतो. पण तो कसा होतो? हे तुम्हाला माहिती नसेल.
'मधमाशांच्या पोळ्यामध्ये एकच राणी मधमाशी असते. राणी मधमाशीचं काम पिल्लांना जन्म देणे असतं. राणी मधमाशी तसंच 'नर' मधमाशी (Drones) यांचं आकाशात मिलन होतं. त्यालाचं फ्लाईट मेटींग (Flight meeting) असं म्हणतात. हे मिलन एवढ जोरदार असतं की, त्यामुळं नर मधमाशीची एन्डोफिलीस (लिंगच्या आतील थैलीचा भाग) फटल्या जातो. पोटाचा भाग पण फाटल्यामुळं नर मधमाशीचा मृत्यू होतो'. - सचिन देबाजे, (Research Scholar Department of Zoology Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar)
मिलनानंतर का मरतात नर माशा ? : नर मधमाशांना एकदाच संभोग करता येतो. एकदा राणी माशीसोबत मिलन (Sex) केल्यावर, तिचे पुनरुत्पादक अवयव फटतात. या प्रक्रियेमुळं नर मधमाशीच्या शरीराला नुकसान होतं. मिलन झाल्यानंतर नर मधमाशी आकाशातून खाली पडते, त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू होतो.
पोळ्यातील जीवनाचं चक्र : नर मधमाशांच्या दुःखद अंतानंतर मादी मधमाशी पोळ्यात परतते. त्यानंतर ती पोळ्यात अंडी घालणं सुरू करते. नर मधमाशींचा मृत्यू हा निसर्ग चक्राचा एक आवश्यक भाग आहे. नराशिवाय राणी मधमाशा अंड्याची निर्मिती करू शकत नाही. अशा या जटील प्रक्रियेतून आपल्याला गोड मध मिळतं. मात्र त्यामागील खरं सत्य आपल्याला माहित नसतं.
मधमाशीचं जीवन हे निसर्गाच्या कार्यक्षमतेचं एक आकर्षक उदाहरण आहे. त्यांचा एकमेव उद्देश पोळ्यातील मधमाशांचं पुनरुत्पादन करणं आहे. एकदा हा उद्देश पूर्ण झाला, की त्या मधमाशीचा अंत होतो. त्यांच्या जीवनाचा शेवट भयंकर वाटत असला तरी, मधमाशांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी तसंच त्यांच्या प्रजातींचं अस्तित्व पुढं चालू ठेवण्यासाठी नर मधमाशा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांचं बलिदान, जरी संक्षिप्त असलं तरी, मधमाशांमुळं निसर्गचक्र टिकून राहतं.
References :
1. Winston, M. L. (1991). The Biology of the Honey Bee. Harvard University Press.
2. Page, R. E., & Erickson, E. H. (1988). Reproduction by Worker Honey Bees. Behavioral Ecology and Sociobiology, 23(2), 117-126.
3. Seeley, T. D. (1985). Honeybee Ecology: A Study of Adaptation in Social Life. Princeton University Press.