हैदराबाद WhatsApp Custom Chat List Feature : WhatsApp एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून याचा वापर जगभरातील लाखो नागरीक रोज करतात. आपल्या मित्रांशी, नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळं मेटानं यात वेळोवेळी अनेक बदल देखील केले आहेत. आता कंपनीनं वापरकर्त्यांसाठी नविन फिचर आणलं आहे. WhatsApp वर आता वापरकर्त्यांना त्यांची चॅट लिस्ट व्यवस्थापित करता येणार आहे. ‘कस्टम लिस्ट’ असं या फिचरचं नाव आहे. या वैशिष्ट्यासह, वापरकर्ते त्यांच्या चॅटचं त्यांच्या आवडीच्या ग्रुपमध्ये वर्गीकरण करू शकतात, ज्यामुळं त्यांना चॅट सहजपणे शोधण्यात आणि त्यांच्या आवडीनुसार सेट करण्यात मदत होईल. चॅट लिस्ट कशी तयार करावी जाणून घेऊया..
पसंतीनुसार चॅट फिल्टर : व्हॉट्सॲपनं एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की "तुम्ही आता तुमच्या पसंतीनुसार चॅट फिल्टर करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य, ऑफिसचे मित्र, शेजारी, इतर मित्रांच्या लिस्ट तयार आणि वर्गीकृत करू शकता. या लिस्ट तुम्हाला चॅटवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करणार आहेत". सूचीसह, वापरकर्ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी, कार्यालयातील सहकारी, शेजारी किंवा इतर कोणत्याही श्रेणीसाठी ग्रुप तयार करू शकतात. हे वापरकर्त्यांना संपूर्ण चॅट सूचीमध्ये स्क्रोल न करता विशिष्ट संभाषणांवर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देणार आहे.
लिस्ट कशी तयार करावी : सूची तयार करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. वापरकर्त्यांनी चॅट्स टॅबच्या शीर्षस्थानी असलेल्या फिल्टर बारमधील "+" चिन्हावर टॅप करावं आणि त्यांच्या नवीन सूचीसाठी नाव जोडावं. त्यानंतर वापरकर्ते त्यांच्या आवडीच्या यादीमध्ये कोणतेही चॅट जोडू शकतात. वापरकर्ते सूची संपादित देखील करू शकतात. सूची संपादित करणं देखील खूप सोपं आहे. एकदा सूची तयार झाल्यानंतर, ती फिल्टर बारमध्ये दिसते, ज्यामुळे वेगवेगळ्या चॅट गटांमध्ये सहज स्विच करता येते.
हे वाचलंत का :