हैदराबाद : टेस्ला मॉडेल 3 एक ऑटोपायलट प्रगत प्रणाली आहे.यालाच ड्रायव्हरलेस सुविधा देखील म्हणतात. योग्यरितीनं वापरल्यास, ऑटोपायलट ड्रायव्हर म्हणून तुमचा एकूण वर्कलोड कमी होऊ शकतो. यासाठी टेस्ला कंपनीनं सुरक्षेचा विचार करून नवीन कारला पॉवरफुल व्हिजन प्रोसेसिंगसह सुसज्ज केलं आहे. त्यांनी ऑटोपायलट वैशिष्ट्यांसह बाजारपेठेसाठी उत्पादित वाहनं लाँच केली आहेत. आज आपण टेस्लाच्या मॉडेल 3 च्या मॅन्युअलबद्दल माहिती घेणार आहोत. बेसिक ऑटोपायलटमध्ये ट्रॅफिक-अवेअर क्रूझ कंट्रोल आणि ऑटोस्टीअरचा समावेश होतो.
ट्रॅफिक-अवेअर क्रूझ कंट्रोल : ट्रॅफिक-अवेअर क्रूझ कंट्रोल तुमचा वेग आणि तुमच्या समोरच्या वाहनापासून अंतर राखून ठेवण्याचं काम करतं. यालाच ऑटोस्टीर असं म्हणतात. ऑटोपायलटमध्ये अतिरिक्त वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. ऑटोपायलट वैशिष्ट्ये म्हणजे ड्रायव्हरचा वर्कलोड कमी करणे, लेन किंवा पार्किंग बदलणे, यासारख्या सामान्य क्रिया सुलभ करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.
ऑटो लेन चेंज : जेव्हा तुम्ही वळण घेतांना सिग्नल संलग्न करता तेव्हा ऑटोस्टीर सक्रिय असतो. तेव्हा तुमची कार ऑटो मॉडेल 3 जवळच्या लेनमध्ये हलवते.
ऑटोपायलट नॅव्हिगेट : महामार्गाच्या ऑन-रॅम्पपासून ऑफ-रॅम्पपर्यंत सक्रियपणे मार्गदर्शन करतं. ज्यामध्ये लेन बदल करणे, नेव्हिगेट इंटरचेंज करणे, वळण सिग्नलचा स्वयंचलितपणे वापर करणे आदी गोष्टींचा यात समावेश होतो.
स्मार्ट समन : तुम्हाला भेटण्यासाठी किंवा पूर्वनिश्चित लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी, पार्किंगच्या जागेच्या बाहेर आणि अधिक जटिल वातावरणातून मॉडेल 3 हलवते
ट्रॅफिक लाइट आणि स्टॉप साइन कंट्रोल : ट्रॅफिक लाइट आणि स्टॉप साइन कंट्रोल हे ट्रॅफिक लाइट आणि स्टॉपची चिन्हे ओळखण्यासाठी डिझाइन केलं आहे. जे ट्रॅफिक-अवेअर क्रूझ कंट्रोल किंवा ऑटोस्टीर वापरताना मॉडेल 3 ला थांबवतं. हे वैशिष्ट्य GPS डेटा व्यतिरिक्त वाहनाच्या फॉरवर्ड-फेसिंग कॅमेऱ्यांचा वापर करतं. तसंच हिरवा, पिवळा अशा सर्व ट्रॅफिक लाइट्ससाठी कारची गती कमी करतं.
सुरक्षा वैशिष्ट्ये : सप्टेंबर 2014 नंतर उत्पादित केलेल्या सर्व टेस्ला वाहनांवर सुरक्षिततेसाठी सुरक्षा वैशिष्ट्ये मानक आहेत. ऑटोपायलट सिस्टमची काही खास वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग : गाडी चालवताना काही अडथळा आल्यास स्वयंचलित ब्रेकिंगची सिस्टीमकार्यरत आहे.
अपघात आलर्म : मंद गतीनं चालणाऱ्या किंवा थांबलेल्या वाहनमुळे अपघाताची चेतावणी दिली जाते. तसंच अडथळ्यांसह संभाव्य टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जाते.
अडथळ्याची जाणीव प्रवेग : कमी वेगाने वाहन चालवताना तुमच्या वाहनासमोर अडथळा आढळल्यास आपोआप कारचा वेग कमी होतो.
ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग : लेन बदलताना एखादे वाहन किंवा अडथळा आढळल्यास चेतावणी.
हे वाचलंत का :