हैदराबाद TVS Apache RR 310 : TVS नं आज भारतात Apache RR 310 मोटरसायकल लाँच केलीय. ज्याची सुरुवातीची किंमत 2.75 लाख रुपय ठेवण्यात आली आहे. बाईकमध्ये अनेक छोटे अपग्रेड्स दिसताय. बाईकचे सर्वात मोठे अपग्रेड म्हणजे बाईकचे इंजिन जे पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनलं आहे. बाईकमध्ये आणखी काय खास आहे ते जाणून घेऊया.
TVS Apache RR 310 : TVS ही एक सुप्रसिद्ध भारतीय दुचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या बाईकसोबत कंपनीच्या स्कूटर्सनाही भारतात खूप पसंती दिली जाते. आज TVS नं भारतात TVS Apache RR 310 चं अपडेटेड मॉडेल लॉन्च केलंय. ज्याची सुरुवातीची किंमत रु. 2.75 लाख आहे. जर तुम्हाला Apache RR 310 चे टॉप मॉडेल घ्यायचं, असेल तर तुम्हाला 3.25 लाख रुपये खर्च करावं लागतील.
अधिक शक्तिशाली इंजिन : TVS Apache RR 310 मध्ये पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली इंजिन दिलं आहे. अधिक शक्तिशाली इंजिन 38 हॉर्सपावर आणि 29nm टॉर्क जनरेट करते. आधीच्या मॉडेलमध्ये असलेल्या इंजिन केवळ 34 हॉर्सपावर निर्माण करू शकत होतं. इंजिनमध्ये पूर्वीपेक्षा मोठं पिस्टन दिलं आहे. बाईकमध्ये एक मोठा एअरबॉक्स देखील आहे, ज्यामुळे बाईक पूर्वीपेक्षा खूपच चांगली दिसत आहे.
'या' फिचरसाठी मोजावे लागणार अधिक पैसे : तुम्ही तुमच्या Apache RR 310 ला कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, कॉर्नरिंग क्रूझ कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज करू शकता. TVS या इलेक्ट्रॉनिक अपग्रेडला RT-DSC (रेस ट्यूनड डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल) म्हणते. यासाठी तुम्हाला 16 हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या बाईकमध्ये पूर्णपणे ॲडजस्टेबल फ्रंट KYB सस्पेंशन, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ब्रास चेन हवी असल्यास त्यासाठी तुम्हाला 18 हजार रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील.
हे वचालंत का :
- फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची तारीख जाहीर, स्मार्टफोन, लॅपटॉप खरेदीवर मिळणार बंपर सुट - Flipkart Big Billion Days Sale 2024
- Motorola Edge 50 Neo भारतात लॉन्च, पाच वर्ष मिळणार सॉफ्टवेअर अपडेट्स - Motorola Edge 50 Neo Launched
- Realme Narzo 70 Turbo 5G फोनचा आज भारतात सेल सुरू, 2 हजारांची मिळणार सूट? - Realme Narzo 70 Turbo 5G sale