ETV Bharat / technology

मोबईलमुळं अंगावर पडते वीज?: वीज पावसाळ्यातच का पडते? काय आहे वीज पडण्यामागील सत्य?, - How lightning strikes - HOW LIGHTNING STRIKES

How lightning strikes : जेव्हा, हवा आणि पाणी यांच्यात घर्षण होतं, तेव्हा पाण्याचे कणात उर्जा निर्माण होते. ही उर्जा सकारात्मक आणि नकारात्मक (प्लस माइनस) असते. ढगाचा वरचा भाग खूप थंड असतो. त्यामुळं तिथं सकारात्मक (प्लस) उर्जा निर्माण होते. तर ढगांचा खालचा भाग नकारात्मक उर्जा निर्माण करतो. त्यामुळं दोन ढग जेव्हा एकामेंकांवर आदळतात, तेव्हा विजा पडतात.

The Electrifying Truth
पावसाळ्यात वीज कशी पडते (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 31, 2024, 11:34 AM IST

हैदराबाद How lightning strikes : पावसाळ्याच्या दिवसात पृथ्वी हिरवीगार होते. जणू पृथ्वीनं हिरवा शालूच नेसलाय, असं मनमोहक दृष्य आपल्याला पहायला मिळतं. पावसाळ्यात विजांचा झगमगाट हे निसर्ग मातेच्या सामर्थ्याचं आकर्षक परंतु भयानक तितकच भीतीदायक रुप आपल्याला दिसतं. त्यामुळं वीज मानवासाठी प्राणघातक देखील ठरू शकते. पण पाऊस पडतो, तेव्हा वीज नेमकी कशी चमकते?, ती जमीनीवर कशी पडते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण याच विजेच्या पडण्याचं सत्य जाणून घेणार आहोत.

विजेची निर्मिती : वीज (लाइटनिंग) हा एक प्रचंड इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज असलेला प्रकार आहे. जो ढगांच्या घर्षणामुळं निर्मणा होतो. या वीजेची प्रक्रिया ढगांमध्ये विद्युत शुल्क जमा होण्यापासून सुरू होते. जेव्हा पावसाचं ढग निर्माण होतं, तेव्हा ढगातील अपड्राफ्ट्स आणि डाउनड्राफ्ट्समुळं पाण्याचे थेंब आणि बर्फाचे स्फटिक एकमेकांवर आदळतात, ज्यामुळं वीज निर्माण होते.

विजांच्या निर्मितीमध्ये पावसाची भूमिका : विजांच्या निर्मितीमध्ये पावसाची भूमिका महत्त्वाची असते. पाऊस जितका मुसळधार असेल, तितकी वीज पडण्याची शक्यता जास्त असते.

बर्फ आणि पाण्याची टक्कर : पाऊस ढगात बर्फ आणि पाण्याचं मिश्रण तयार करण्यास मदत करतो. त्यामुळं बर्फाचे कण जेव्हा ढगांवर आदळतात, तेव्हा ते प्रचंड इलेक्ट्रॉन्स निर्माण करतात. ज्यामुळं विद्युत लहरी वेगळ्या होतात.

इलेक्ट्रिकल चार्ज सेपरेशन : ढगाचा वरचा भाग सकारात्मक (प्लस) उर्जा तयार करतो, तर ढगाचा खालचा भाग नकारात्मक (माइनस) उर्जा तयार करतो. त्यातूनच विजेचा जन्म होतो.

लीडर स्ट्रोक : जसजसं इलेक्ट्रिकल चार्ज तयार होतो, तसतसं आयनीकृत हवेच्या रेणूंचं एक चॅनेल तयार होतं. ज्याला लीडर स्ट्रोक देखील म्हणतात. हे चार्ज ढग आणि जमिनी दरम्यान तयार होऊ लागतं.

स्ट्राइक : जेव्हा लीडर स्ट्रोक जमिनीवर पोहचतो, तेव्हा स्ट्रोक विजेसाठी एक प्रवाहकीय मार्ग तयार करतो. याला रिटर्न स्ट्रोक म्हणून ओळखलं जातं. हाच स्ट्रोक आपल्याला विजेसारखा दिसतो. रिटर्न स्ट्रोक 50 हजार डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत पोहोचू शकतो, जे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा पाच पट जास्त गरम असतो.

विजेपासून बचाव कसा करावा : विजेचा लखलखाट विस्मयकारक असला तरी, त्याचे धोके लक्षात ठेवणं आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला काही सुरक्षासंदर्भात टिपा सांगणार आहोत. ज्यामुळं विजेपासून जीव वाचवता येईल.

हवामानाचं निरीक्षण करा : देशासह राज्यसरकारचा हवामान विभाग नागरिकांना अलर्ट करतं. तसंच तुम्ही हवामानविषय बातम्या देखील पाहू शकता. हवामन विभागानं दिलेला अंदाज आणि इशाऱ्यांवर प्रत्येकांनं लक्ष ठेवावं.

सुरक्षित जागा शोधावी : जर तुम्हाला मेघगर्जना ऐकू येत असेल, वीज चमकत असेल किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असेल तर ताबडतोब तुम्ही सुरक्षित आश्रय घ्या. पावसात झाडाखाली शक्यतो उभं राहू नये.

विद्युत प्रवाहकीय वस्तू टाळा : जेव्हा तुम्ही सुरक्षित ठिकाण शोधता तेव्हा, धातूचं कुंपण, सायकल यासारख्या काही विद्युद प्रवाहकीय वस्तू टाळायला हवा. तसंच तुमच्याकडं मोबाईल फोन असेल तर, तो बंद करायला हवा. कारण मोबाईल फोनमधून निघणाऱ्या विद्यूत लहरीमुळं देखील वीज पडण्याची दाड शक्यता असते.

थोडक्यात काय तर, बर्फ आणि पाण्याच्या कणांच्या टक्करामुळं ढगांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होते. त्यावेळी विजा जमीनीच्या दिशेन झेप घेतात. वीज पडणं प्राणघातक असू शकतं, परंतु त्यामागील विज्ञान समजून घेतल्यानं आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची, शक्तीची मदत होऊ शकते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा, तुम्ही मेघगर्जना ऐकाल, तेव्हा विजांच्या मागं असलेलं विद्युतीकरणाचं सत्य नक्की लक्षात ठेवा.

हे वाचलंत का :

पृथ्वीवर प्रथमच विद्युत क्षेत्राचा लागला शोध, 60 वर्षांच्या प्रयत्नांना यश - Electric Field on Earth

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.