ETV Bharat / technology

टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना अटक, 20 वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा - Telegram founder Pavel Durov - TELEGRAM FOUNDER PAVEL DUROV

Telegram founder Pavel Durov : टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव यांना फ्रेंच पोलिसांनी अटक केली आहे. पॅरिस विमानतळावर उतरताच त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी पॅरिसजवळील ले बोर्जेट विमानतळावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. ते त्यांच्या प्रायव्हेट जेटनं पॅरिसला जात होते. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.

Telegram founder Pavel Durov
टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 26, 2024, 4:10 PM IST

पॅरिस Telegram founder Pavel Durov : लोकप्रिय एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ॲपनं नियमाचं पालन न केल्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकणात ते दोषी आढळल्यास त्यांना 20 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

900 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते : एका अहवालांनुसार, टेलिग्राम ॲपवर कथित गुन्हेगारी सामग्रीचा प्रसार केल्याचा आरोप आहे. पावेल दुरोव सध्या दुबईमध्ये राहतात. त्याच्याकडं फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीचं (यूएई) दुहेरी नागरिकत्व आहे. त्यांच्या टेलिग्रामवर सुमारे 900 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत.

दुरोव जगातील 120 वे श्रीमंत व्यक्ती : सरकारी नियमांचं पालन करण्यास नकार दिल्यानंतर टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी 2014 मध्ये रशियाला सोडचिठ्ठी दिली होती. 25 ऑगस्टपर्यंत, दुरोव हे जगातील 120 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. 2022 मध्ये, त्यांना फोर्ब्स मासिकानं UAE मधील सर्वात श्रीमंत प्रवासी व्यक्ती म्हणून घोषित केलं होतं. एका अहवालानुसार, त्यांनी रशिया सोडल्यानंतर देशाच्या साखर उद्योग विविधीकरण फाउंडेशनला $250,000 देणगी देऊन सेंट किट्स आणि नेव्हिसचे नागरिकत्व प्राप्त केलं होतं. तसंच स्विस बँकांमध्ये $300 दशलक्ष रोख जमा केली होती. जानेवारी 2018 मध्ये, दुरोव यांनी जाहीर केलं की, ते क्रिप्टोकरन्सी आणि TON प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे. यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांकडून एकूण $1.7 अब्ज डॉलर जमा केले होते. त्यांचा क्रिप्टो उपक्रम यूएसनं थांबवला होता. 2018 मध्ये, कंपनीनं रशियन सुरक्षा सेवांना सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर रशियानं टेलिग्रामला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला.

ले बोर्जेट विमानतळावर अकट : पॅरिसच्या बाहेरील ले बोर्जेट विमानतळावर फ्रान्सच्या फसवणूक विरोधी कार्यालयानं दुरोव यांना त्यांच्या खाजगी जेटमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच अटक केली. त्याची अटक प्राथमिक तपासाचा भाग म्हणून फ्रेंच राष्ट्रीय न्यायिक पोलिसांनी जारी केलेल्या अटक वॉरंटवर आधारित होती. रविवारी त्यांना न्यायालयात हजर करणं अपेक्षित होतं. दोषी आढळल्यास त्यांना 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यानंतर टेलीग्रामनं नंतर कोणतीही त्वरित प्रतिक्रिया दिली नाहीय. दुरोव आणि त्याचा भाऊ निकोलाई यांनी 2013 मध्ये मेसेजिंग ॲपची स्थापना केली होती. त्यांचे सुमारे 900 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. टेलीग्राम एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मेसेजिंग ऑफर करतो आणि वापरकर्ते फॉलोअर्सपर्यंत माहिती त्वरीत प्रसारित करण्यासाठी "चॅनेल" देखील सेट करू शकतात.

हे वाचलंत का :

  1. शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी वापरलेल्या दुर्मिळ सामग्रीचं प्रदर्शन : डॉ. सी.व्ही. रामन यांच्या तबला मुख्य आकर्षण - Science City of Bangalore
  2. पुण्यातील तरुणानं बनवला विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, डिझेल बरोबरच चालकाचा खर्चही वाचणार - Driverless Electric Tractor
  3. भारतानं पहिलं हायब्रिड रॉकेट 'RHUMI-1' केलं लाँच - Reusable Hybrid Rocket RHUMI 1

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.