ETV Bharat / technology

टाटा मोटर्सच्या पहिल्या ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन ट्रकची घोषणा, सौदी अरेबियामध्ये होणार पहिला एएमटी ट्रक लाँच - TATA PRIMA 4440 S AMT TRUCK

टाटा मोटर्सनं मंगळवारी आपला पहिला ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) ट्रक, Tata Prima 4440.S AMT, सौदी अरेबियामध्ये लॉंच करण्याची घोषणा केलीय.

Tata Prima 4440
Tata Prima 4440 (Tata Motors)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 20, 2024, 11:14 AM IST

दम्माम : टाटा मोटर्सनं मंगळवारी आपला पहिला ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) ट्रक, Tata Prima 4440.S AMT, सौदी अरेबियामध्ये लॉंच करण्याची घोषणा केलीय. टाटा मोटर्सनं दम्माम येथील हेवी इक्विपमेंट अँड ट्रक्स (HEAT) शोमध्ये या ट्रकची पाच उच्च-कार्यक्षमता उत्पादनं देखील प्रदर्शित केली. सौदी अरेबिया हा टाटा मोटर्ससाठी एक महत्त्वाचा देश आहे. सौदी अरेबियामध्ये झपाट्यानं बदल होत असल्यानं, आम्ही आमच्या प्रगत तंत्रज्ञानासह ट्रक लॉंच करत आहोत," असं टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचे इंटरनॅशनल बिझनेस हेड अनुराग मेहरोत्रा ​​यांनी म्हटंल आहे.

"नवीन तंत्रज्ञान, विश्वासार्हता आणि ग्राहकांच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करून, सौदी अरेबियामध्ये आमचा पहिला स्वयंचलित मॅन्युअल ट्रान्समिशन ट्रक लॉंच करताना आम्हाला अभिमान वाटतो." - अनुराग मेहरोत्रा, ​​इंटरनॅशनल बिझनेस हेड, टाटा ​

​इंजिन क्षमता : टाटा Prima 4440.S AMT ट्रक जड वाहतुकीसाठी योग्य आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, इंधन बचत आणि टिकाऊ ऑटोमेटेड ट्रान्समिशनसह, ट्रक लोड-आधारित स्पीड कंट्रोल सिस्टम, सिस्टम डाउन प्रोटेक्शन सिस्टम आणि चांगल्या इंधन कार्यक्षमतेसाठी ऑटो स्टार्ट-स्टॉप सिस्टम यासारख्या अनेक स्मार्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. हे युरो-व्ही कंप्लायंट 8.9-लिटर कमिन्स इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 400 bhp आणि 1,700 Nm टॉर्क जनरेट करतं.

टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील : न्यूमॅटिकली सस्पेंडेड सीट आणि टिल्ट-आणि-टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील असलेली आधुनिक केबिन ड्रायव्हरला आराम देते. टाटा मोटर्स 40 हून अधिक देशांमध्ये 1-टन ते 60-टन मालवाहू वाहनं आणि 9-सीटर ते 71-सीटर मास मोबिलिटी सोल्यूशन्सपर्यंतचे विस्तृत व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ ऑफर करतं. टाटा मोटर्सच्या प्रगत R&D क्षमतांद्वारे समर्थित, ही वाहनं स्थानिक बाजाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आहेत.

हे वाचलंत का :

  1. भारतात महिंद्रा थारची 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री, थार रॉक्सचाही समावेश
  2. TVS Apache RTR 160 4V नवीन तंत्रज्ञानासह लॉंच, जाणून घ्या किंमत आणी फीचर
  3. वाहन खरेदीवर टॅक्ससह नोंदणी शुल्कात 100 टक्के सूट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.