ETV Bharat / technology

2025 मध्ये Tata Sierra, Tata Harrier EV, Tata Sierra EV लॉंच होण्याची शक्यता - TATA LAUNCH NEW SUV IN 2025

टाटा कंपनी 2025 मध्ये जबरदस्त नवीन SUV लाँच करणार आहे. यात Tata Sierra, Tata Harrier EV, Tata Sierra EV चा समावेश असण्याची शक्यता आहे.

Tata Sierra
टाटा सिएरा (Tata)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 25, 2024, 4:15 PM IST

हैदराबाद Tata launch new SUV in 2025 : टाटा मोटर्सनं 2024 मध्ये Altroz ​​Racer, Tata Nexon CNG, आणि SUV Coupe Curve चे वेगवेगळे मॉडेल भारतीय बाजारात लॉंच केले आहेत. आता कंपनीनं पुढील वर्षात म्हणजे 2025 मध्ये आणखी नवीन SUV लाँच करण्याचं नियोजन केलं आहे. त्यात तीन महत्वाच्या कारचा समावेश आहे. त्याचबद्दल आज आम्ही तुम्हाला या बातमीतून माहिती देणार आहोत. तर चला जाणून घेऊया त्या खास कारबद्दल..

2025 मध्ये टाटा नवीन एसयूव्ही लॉंच : येणारे वर्ष 2025 टाटा मोटरसाठी खूप चांगलं असणार आहे. कारण ही भारतीय कंपनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त नवीन उत्पादनं आणण्याच्या तयारीत आहे. तुम्ही टाटा Sierra बद्दल ऐकलं असेलच, जी एसयूव्ही टाटा मोटर्सला नवीन ओळख देण्यात यशस्वी झाली होती. आता ही आयकॉनिक कार पुनरागमन करणार आहे. या वर्षी मोबिलिटी एक्स्पोमध्ये देखील ही कार प्रदर्शित करण्यात आली होती. आता बातमी येत आहे की पुढील वर्षी या कारचं उत्पादन केलं जाऊ शकतं. यासोबत हॅरियरचे इलेक्ट्रिक मॉडेलही लॉंच केलं जाऊ शकतं.

Tata Harrier EV : Tata Motors पुढील वर्षी भारतात आपल्या मध्यम आकाराच्या SUV Harrier चं इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये मोबिलिटी एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या हॅरियर ईव्हीनं ग्राहकांची मने जिंकली आहेत. आता ती पुढील वर्षी भारतीय रस्त्यांवर दिसण्यासाठी सज्ज आहे. Tata Harrier EV मध्ये एक शक्तिशाली बॅटरी पॅक असेल, जो एका चार्जवर 600 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. टाटा हॅरियर इलेक्ट्रिक देखील लूक आणि फीचर्समध्ये खूपच आश्चर्यकारक असेल.

Tata Sierra EV : Tata Motors पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आपली प्रतिष्ठित Sierra SUV परत आणणार आहे. ती इलेक्ट्रिफाइड मॉड्युलर आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. सिएरा इलेक्ट्रिक तसंच पेट्रोल आणि डिझेल सारख्या पॉवरट्रेन पर्यायांसह ऑफर केली जाईल. तसंत या कार स्टायलिश लुक आणि बॉक्सी डिझाइनसह ऑफर केल्या जाईल. त्याच्या इलेक्ट्रिक मॉडेलची रेंज 500 किमी पेक्षा जास्त असू शकते. त्याच वेळी, Tata Sierra चे सर्व इलेक्ट्रिक आणि पेट्रोल-डिझेल मॉडेल वैशिष्ट्यांच्या बाबतीत खूपच आश्चर्यकारक असतील.

हे वाचलंत का :

  1. नवीन BMW M5 भारतात लॉन्च
  2. व्होल्वो कंपनीनं केली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच, 'या' मॅडेलवर 5.05 लाख रुपयांची सूट
  3. टाटा मोटर्सच्या पहिल्या ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन ट्रकची घोषणा, सौदी अरेबियामध्ये होणार पहिला एएमटी ट्रक लाँच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.