हैदराबाद Tata Curvv 5 star safety rating : टाटा मोटर्सनं या वर्षीच आपली SUV कूप Tata Curvv भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. आता या कारची क्रॅश चाचणी भारत NCAP द्वारे करण्यात आली. ज्यामध्ये Tata Curvv coupe SUV नं 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केलं आहे.
इतके मिळाले गुण : कारनं सुरक्षा चाचणीत प्रौढ नागरिकांच्या संरक्षणासाठी 29.50/32 आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी 43.66/49 असे गुण मिळवले आहे. चाचणी केलेल्या पॉवरट्रेन क्रॅशमध्ये डिझेल एमटी, पेट्रोल डीसीटी आणि पेट्रोल एमटीचा समावेश आहे. चाचण्यांमध्ये, डोकं, मान शरीराच्या खालच्या भागासाठी चांगलं गुण मिळले आहे. या कारचा फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टसाठी एकूण स्कोअर 14.65/16 आणि साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टसाठी 14.85/16 होता. मुलांच्या बाबतीत, स्कोअर CRS स्कोअरसाठी 12/12 आणि वाहन मूल्यमापन स्कोअरसाठी 9/13 होता.
Tata Curvv मध्ये उपलब्ध सुरक्षा वैशिष्ट्ये : या कारच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट, ESC, सीटबेल्ट रिमाइंडर आणि पादचारी संरक्षण मानक आहे. 7 ऑगस्ट 2024 रोजी भारतात लॉन्च झालेली Tata Curvv भारतात Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara आणि Toyota Hyder सारख्या कारशी स्पर्धा करते.
आवृत्तीमध्ये तीन इंजिन पर्याय : Tata Curvv ची पॉवरट्रेन कारच्या ICE आवृत्तीमध्ये तीन इंजिन पर्याय आहेत. त्यापैकी पहिला 1.2-लीटर हायपेरियन T-GDI टर्बो-पेट्रोल आहे, जो 123 bhp ची शक्ती आणि 225 न्यूटन मीटरचा टॉर्क देतो. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि DCT गियर बॉक्सशी जोडलेलं आहे. दुसरं इंजिन 1.2-लिटर रेव्होट्रॉन टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 118bhp पॉवर आणि 170 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करतं.
इलेक्ट्रिक व्हर्जन देखील उपलब्ध : या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्स जोडलेलं आहेत. यासह, तिसरा इंजिन पर्याय 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जो 116bhp पॉवर आणि 260 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करतं. या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्स जोडलेले आहेत. Tata Curvv चं इलेक्ट्रिक व्हर्जन देखील कंपनी विकत आहे.
हे वाचलंत का :