हैदराबाद Skoda Kylaq : कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये आधीच जोरदार स्पर्धा आहे. आता Skoda India नं या क्षेत्रात नवीन Skoda Kylaq लाँच केली आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपये आहे. या कारची बुकिंग 2 डिसेंबरपासून भारतात सुरू होईल. नवीन Kylaq ची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे, याशिवाय, कॉम्पॅक्ट SUV आगामी 2025 इंडिया मोबिलिटी एक्सपोमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्व-नवीन सब-फोर मीटर एसयूव्ही अनेक बदलांसह लॉंच करण्यात आली आहे. यात 17 इंची अलॉय व्हील्स आहेत. भारतीय बाजारपेठेत ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्पर्धा करेल.
Skoda Kylaq वैशिष्ट्ये : किंमतीनुसार, Skoda नं Kilac कॉम्पॅक्ट SUVमध्ये भरपूर वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत. यामध्ये ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि 6-स्पीकर साउंड सिस्टम यांचा समावेश आहे. याशिवाय, सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही एक मजबूत कार आहे, यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल प्रोग्राम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, हेडरेस्ट आणि सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट देण्यात आला आहे. त्याची लांबी 3.95 मीटर, व्हीलबेस 2.56 मीटर, 189 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 44 लीटर बूट स्पेस आहे.
Skoda Kylaq किती शक्तिशाली : स्कोडा ऑटो इंडियानं नवीन Kilac कॉम्पॅक्ट SUV सह 1.0-लिटर TSI पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 114 bhp पॉवर आणि 178 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यासह, ग्राहक 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय निवडू शकतात. Skoda नं जवळपास 10 वर्षांनंतर 10 लाख रुपयांपेक्षा स्वस्त कार लॉंच केली आहे, जी कंपनीसाठी खूप महत्त्वाची आहे. भारतात, ही कार Hyundai Venue, Kia Sonnet, Mahindra XUV 3X0 Maruti Suzuki Franx, Maruti Suzuki Brezza, आणि Toyota Tigor सारख्या कारशी स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :