ETV Bharat / technology

Samsung Galaxy S25 Ultra चे फीचर झाले लिक, फोनमध्ये 200 MP कॅमेरा - SAMSUNG GALAXY S25 ULTRA

Samsung पुढच्या वर्षी आपला Galaxy S25 सीरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनमध्ये 200 MP कॅमेरा मिळणार आहे. जाणून घ्या फोनची किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy S25 Ultra
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat MH DESK)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 19, 2024, 10:53 AM IST

हैदराबाद Samsung Galaxy S25 Ultra: सॅमसंगच्या गॅलेक्सी एस. सीरीज पुढील वर्षात लॉंच होण्याची शक्यता आहे. सॅमसंग अनेक नवीन अपग्रेड्ससह Galaxy S25 सिरीज सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनी जानेवारी 2025 मध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये ही सीरीज आणू शकते. सॅमसंग सॅमसंग गॅलेक्सी S25 सीरीज अंतर्गत चार फोन लॉंच करण्यात येतील,अशी शक्यता आहे. ज्यामध्ये व्हॅनिला गॅलेक्सी S25+, Galaxy S25 अल्ट्रा आणि सर्व- नवीन Galaxy S25 स्लिम प्रकारचा समावेश असेल.

Samsung Galaxy S25 Ultra लॉंच तारीख : सॅमसंगनं अद्याप Samsung Galaxy S25 Ultra च्या लॉंचची तारीख अधिकृतपणे घोषित केलेली नाही, परंतु संभाव्य लॉंच तारखेबद्दल चर्चा सुरू आहे. एका अहवाला नुसार, कंपनी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात नवीन Galaxy S25 Ultra भारतात आणि इतर बाजारपेठांमध्ये लॉंच करू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्राची किंमत : Samsung Galaxy S24 Ultra सीरीजनं या वर्षी जानेवारीमध्ये भारतात 1 लाख 29 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह पदार्पण केलं होतं. आगामी Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत देखील अशीच असेल, असं म्हटलं जात आहे, परंतु नेमकी किंमत लॉंच इव्हेंटमध्ये घोषित केली जाईल.

Samsung Galaxy S25 Ultra फीचर्स : Samsung Galaxy S25 Ultra मध्ये Qualcomm सह नवीनतम Snapdragon 8 Elite चिपसेट असण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोन नवीन Galaxy AI फीचर्सनं सुसज्ज असू शकतो. सुधारित AI प्रक्रियेसह हँडसेटमध्ये 200MP रियर कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. Galaxy S25 Ultra मध्ये 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3x आणि 10x ऑप्टिकल झूमसह दोन टेलीफोटो लेन्स असू शकतात. फोन 100x स्पेस झूम देऊ शकतो. डिस्प्लेबद्दल बोलायचं झाले तर, हा फोन 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.9-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देऊ शकतो.

हे वाचलंत का :

  1. स्मार्टफोनच्या उत्पन्नात जोरदार वाढ; 4 वर्षात सरकार झालं मालामाल, महसूल 19 पटीनं वाढला
  2. Huawei Mate 70 सीरीज 26 नोव्हेंबर होणार लॉंच, Kirin 9100 चिप आणि प्रगत बॅटरी
  3. गुगल मॅपचे 'हे' फीचर्स तुम्हाला माहीत आहेत का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.