ETV Bharat / technology

रेडमी वॉच 5 लाइटची दमदार एंट्री, 18 दिवसांपर्यंत टिकते बॅटरी - Redmi Watch 5 Lite Launched - REDMI WATCH 5 LITE LAUNCHED

Xiaomi नं Redmi Watch 5 Lite डिजीटल घड्याळ लॉन्च केलं आहे. या घड्याळात 1.96 इंच AMOLED डिस्प्ले GPS ट्रॅकर आहे. वॉच काळ्या आणि हलक्या सोनेरी रंगात उपलब्ध आहे. या वॉचची किंमतीसह फिचर जाणून घेऊया...

Redmi Watch 5 Lite
रेडमी वॉच 5 लाइट (Redmi)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 26, 2024, 10:11 AM IST

नवी दिल्ली : Xiaomi नं आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Redmi Watch 5 Lite वॉच लॉन्च केली आहे. कंपनीनं हे घड्याळ 1.96 इंच AMOLED डिस्प्लेसह आणले आहे. घड्याळ अंगभूत GPS ट्रॅकरसह येते. रेडमी वॉच 5 लाइट कंपनीनं काळ्या आणि हलक्या सोनेरी रंगात आणली आहे. स्मार्ट घड्याळ 3 हजार 999 रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे. ऑफरसह हे घड्याळ 3 हजार 499 रुपयांना खरेदी केलं जाऊ शकतं. आज मध्यरात्री 12 पासून mi.com वरून घड्याळ खरेदी करता येईल.

हे आहेत फिचर :

  • घड्याळ 1.96-इंच (410 x 502 पिक्सेल) AMOLED स्क्रीनसह 600 nits पर्यंत ब्राइटनेससह येते.
  • रेडमी वॉच 200+ घड्याळात 50+फेसवॉच तसंच 30+ AOD स्क्रीन देण्यात आली आहे.
Redmi Watch 5 Lite
रेडमी वॉच 5 लाइट (Redmi)
  • रेडमी वॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर, एक्सीलरोमीटर, जायरोस्कोप देखील तुम्हाला पहायाला मिळणार आहे.
Redmi Watch 5 Lite
रेडमी वॉच 5 लाइट (Redmi)
  • कॉलिंगसाठी, घड्याळात अंगभूत मायक्रोफोन, स्पीकर, कॉलसाठी 2-माइक ENC येतंय.
Redmi Watch 5 Lite
रेडमी वॉच 5 लाइट (Redmi)
  • घड्याळ ट्रॅकिंग, स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटरिंग, पीरियड सायकल मॉनिटरिंग वैशिष्ट्यांसह येतंय.
  • कंपनी 160+ स्पोर्ट्स मोड, 50+ विजेट कस्टमायझेशन, नाईट मोड, DND मोड, थिएटर मोड, वॉटर क्लिअरिंग मोडसह रेडमी वॉच खरेदी करता येणार आहे. यामध्ये 470mAh बॅटरी मिळतेय.

18 दिवसांपर्यंत बॅकअप टाईम : घड्याळाचा सामान्य वापर केल्यास 18 दिवसांपर्यंतच्या बॅटरी टिकते, असा कंपनीनं दावा केलाय. तर जास्त वापर असल्यास 12 दिवस काम बॅटरी करू शकते. हे घड्याळ घालून स्विमिंगही करता येते. कंपनीचं हे घड्याळ 5ATM 50 मीटर पाणी प्रतिरोधक आहे. स्विम ट्रॅकिंगमध्येही हे घड्याळ उपयुक्त ठरणार आहे. Redmi Watch 5 Lite घड्याळाच अलेक्सा अंगभूत आहे. तुम्ही घड्याळात कॅलेंडर सेट करून तुमची महत्त्वाची कामे देखील करू शकता.

हे वाचलंत का :

तुम्हालाही शांत झोप येत नाहीय का? ऍपल वॉचमधील स्लीप एपनिया डिटेक्शन ठेवणार तुमच्या झोपीवर लक्ष - Apple Watch Series 10 Launch

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.