हैदराबाद Realme P2 Pro 5G Launch : स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme नं आज भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला. Realme P2 Pro मध्ये कंपनीनं 24 GB रॅम तसंच 5200 mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. यासोबतच या फोनचं डिझाईनही एकदम स्टायलिश आहे. इतकंच नाही, तर यामध्ये 80 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. या फोनची सर्व माहिती आपण जाणून घेऊया.
Realme P2 Pro फिचर : Realme नं आपल्या नवीन फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 2000 nits च्या पीक ब्राइटनेसला देखील सपोर्ट करतो. याशिवाय या फोनमध्ये AI आय प्रोटेक्शन देखील देण्यात आलं आहे. ज्यामुळं तुमचे डोळे सुरक्षित राहतील. तसंच, फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह येते.
फोन तीन प्रकारात लॉन्च : हा फोन Realme 5.0 UI Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कंपनीनं हा फोन तीन प्रकारात लॉन्च केला आहे. याचं 8GB+128GB स्टोरेज, 12GB+256GB आणि 12GB+512GB असं तीन प्रकार आहेत. त्याच्या टॉप मॉडेलमध्ये 12+12 GB डायनॅमिक रॅम आहे.
कॅमेरा सेटअप : या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं, तर या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सोनी मेन कॅमेरा आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हा फोन Snapdragon 7S Gen 2 चिपसेट प्रोसेसरनं सुसज्ज आहे. पॉवरबद्दल बोलायचं झालं, तर कंपनीनं या फोनमध्ये 5200 mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 80 वॅट सुपरव्हीओओसी फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते. हा फोन IP 65 रेटिंगसह येतो. म्हणजेच हा फोन पाणी आणि धुळीनंही खराब होत नाही.
किती आहे किंमत? : कंपनीनं Realme P2 Pro च्या बेस व्हेरिएंटची किंमत 21 हजार 999 रुपये ठेवली आहे. तर त्याच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 24 हजार 999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 27 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 17 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. सेलमध्ये, बेस व्हेरिएंट फक्त 19 हजार 999 रुपयांना 2,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल.
हे वाचलंत का :