हैदराबाद : आगामी Realme स्मार्टफोन नुकताच चीनच्या 3C सर्टिफिकेशन साइटवर मॉडेल क्रमांक RMX5055 सह सूचीबद्ध करण्यात आला आहे. हा सूचीतील चीनी प्रकार असल्याचं मानलं जातं. हा फोन जागतिक आवृत्तीमध्ये मॉडेल क्रमांक RMX5056 नुसार लॉंच होईल. या फोनचे 3C सर्टिफिकेशनमध्ये स्पेसिफिकेशन्स उघड झाले नसले तरी, याची पुष्टी झाली आहे. हा फोन Realme लवकरच लॉंच करण्याची तयारी करत आहे.
Speed, power, and performance redefined. Powered by Snapdragon 7s Gen 3, the #realme14ProSeries sets new benchmarks—same name, same chip, but two generations ahead with an advanced periscope. Ready to break limits?#realmeIndia pic.twitter.com/Ep3wIxPTqC
— realme (@realmeIndia) December 9, 2024
Realme 14 Pro कॅमेरा तपशील : कॅमेरा FV 5 डेटाबेसनं आगामी स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल काही खास माहिती शेअर केली आहे. Realme 14 Pro मध्ये f/1.8 अपर्चर, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन आणि 26.6mm फोकल लांबीसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा असेल. सेल्फीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 4MP रिझोल्यूशन सेन्सर, EIS सपोर्ट आणि 27.2mm फोकल लांबीसह 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे.
दोन कलर ऑप्शन : यापूर्वी लीक झालेल्या माहितीनुसार Realme 14 Pro 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज अशा तीन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येईल. हा स्मार्टफोन पर्ल व्हाईट आणि स्यूड ग्रे या दोन कलर ऑप्शन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. ज्या वापरकर्त्यांना परफॉर्मन्स, स्टोरेज, डिझाइनसह हा फोन हवा आहे त्यांच्यासाठी Realme 14 Pro हा एक चांगला पर्याय असेल.
Realme 13 Pro, 13 Pro+ तपशील : Realme 13 Pro आणि 13 Pro+ मध्ये Qualcomm Snapdragon 7S जनरेशन 2 प्रोसेसर आहेत. Realme 13 Pro+ मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले असेल. ज्याचं रिझोल्यूशन 2412x1080 पिक्सेल आणि 120hz रिफ्रेश रेट आहे. त्याच वेळी, Realme 13 Pro मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले असेल, ज्याचा 120hz रीफ्रेश रेट आहे. या दोन्ही फोनमध्ये 5200mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 13 Pro+ फोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, तर 13 Pro 45W चार्जिंगला सपोर्ट करतो.
50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा : Realme 13 Pro + मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करणारा 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, OIS सपोर्ट असलेला 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. त्याचबरोबर फ्रंटला 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, Realme 13 Pro मध्ये OIS सपोर्टसह 50-megapixel Sony LYT 600 कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. त्याच वेळी, समोर 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.
हे वाचंलत का :