ETV Bharat / technology

प्रभाकर राघवन गुगलचे नवे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी

Prabhakar Raghavan : Google नं नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून प्रभाकर राघवन यांना नियुक्त करण्याची घोषणा केलीय.

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

Prabhakar Raghavan
प्रभाकर राघवन (Etv Bharat Telugu)

हैदराबाद Prabhakar Raghavan : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी Google चे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर राघवन यांच्या नावाची मुख्य तंत्रज्ञ म्हणून घोषणा केलीय. प्रभाकर राघवन यांच्याकडं गुगल सर्च, असिस्टंट, जिओ, ॲड्स, कॉमर्स आणि पेमेंट्स उत्पादनांचा पदभार आहे.

प्रभाकर राघवन गुगलचे मुख्य तंत्रज्ञ : Google सध्या मायक्रोसॉफ्ट, ओपनएआय सारख्या कंपन्याशी स्पर्धा करत आहे. ग्राहकांच्या वर्तनात सतत होणारे बदल देखील स्पर्धेला वाव देत आहेत. त्यामुळेच गुगलनं मुख्य तंत्रज्ञ म्हणून प्रभाकर राघवन यांच्या नावाची घोषणा केलीय. याबात पिचाई यांनी म्हटंलय की, “प्रभाकरन यांना स्वतःच्या कारकिर्दीत मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे. ते 12 वर्षे Google मध्ये नेतृत्व करत आहेत. त्यामुळं त्यांची गुगलचे मुख्य तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.” राघवन यांच्या नेतृत्वाखाली Google नॉलेज अँड इन्फॉर्मेशन (K&I) नवीन मॉडेल्स सक्षम करण्यास मदत होईल. तसंच गुगलच्या उत्कृष्ट उत्पादनाची गती वाढेल, असं पिचाई म्हणाले.

कोण आहेत प्रभाकर राघवन? : प्रभाकर राघवन 2012 मध्ये Google मध्ये सामील झाले होते. ते या आगोदर Yahoo मध्ये होते. त्यांनी शोध, जाहिरात रँकिंग तसंच जाहिरात मार्केटप्लेस डिझाइनमध्ये काम केलं होतं. ते Google Apps आणि Google Cloud चे उपाध्यक्ष होते, अभियांत्रिकी, उत्पादनं व्यवस्थापन करत होते. त्यानंतर त्यांनी स्मार्ट रिप्लाय आणि स्मार्ट कम्पोज सारखी AI उत्पादनं लाँच करून Gmail टीमचं नेतृत्व केलंय. 2018 मध्ये, श्रीधर रामास्वामी यांच्याकडून पदभार स्वीकारून राघवन Google Search, Assistant, जिओ, जाहिराती, वाणिज्य आणि पेमेंट उत्पादनांचे वरिष्ठ उपाध्यक्ष झाले होते. त्यामुळं त्यांच्याकडं आता गुगलनं मुख्य तंत्रज्ञ पदाची नविन जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वचालंत का :

  1. EPFO ने खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, नवा नियम जाणून घ्या अन्यथा...
  2. सॅमसंगची पहिली स्मार्ट रिंग भारतात लाँच, तुमच्या हेल्थची घेणार काळजी
  3. दोन AMOLED डिस्प्लेसह Infinix Zero Flip लॉंच, जाणून घ्या किंमत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.