ETV Bharat / technology

फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा Oppo Find X8 फोन, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप - OPPO FIND X8 SERIES

Oppo Find X8 मालिका 21 नोव्हेंबर 2024 रोजी जागतिक स्तरावर लॉंच होणार आहे. तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये हा फोन प्री-बुक करू शकता.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 12, 2024, 10:59 AM IST

हैदराबाद Oppo Find X8 Series Launch Date Confirmed : Oppo Find X8 मालिका चीनमध्ये ऑक्टोबर, 2024 मध्ये सादर करण्यात आली. यानंतर कंपनीनं आता भारतासह जागतीक बाजारपेठेत Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro लॉंच करण्याची तारीख जाहीर केलीय. तसंच, आगामी फोनचं प्री-बुकिंग देखील 11 नोव्हेंबरपासून अधिकृत वेबसाइटवर सुरू झालं आहे.

स्मार्टफोन ब्रँड Oppo नुसार, Oppo Find X8 मालिका 21 नोव्हेंबर 2024 रोजी जागतिक स्तरावर लॉंच केली जाईल. तुम्ही आजपासून ही मालिका 999 रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता. फोनची प्री-बुकींग करणाऱ्या ग्राहकांना गिफ्ट हॅम्पर देखील मिळणार आहे. ज्यामध्ये कार चार्जर, इअरबड्स आणि टाइप-सी बुक केबल मोफत मिळेल. याशिवाय 55 टक्क्यांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यूही दिली जाईल. तुम्ही हा फोन Oppo साईटवरून ऑर्डर केल्यास तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट आणि 24 महिन्यांची नो-कॉस्ट EMI ची सुविधा देखील मिळेल.

Oppo Find X8 मालिकेची वैशिष्ट्ये : Oppo Find X8 चे ग्लोबल व्हेरिएंट 6.59 इंच डिस्प्लेसह येईल, ज्याची जाडी 7.85 मिमी असेल आणि त्याचे वजन 193 ग्रॅम असेल. हे स्टार ग्रे आणि स्पेस ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. त्याचा प्रो व्हेरिएंट 6.78 इंच स्क्रीन आणि पर्ल व्हाइट आणि स्पेस ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असेल. बेस Oppo Find X8 जागतिक स्तरावर 5630mAh बॅटरीसह लॉन्च केला जाईल, तर प्रो आवृत्तीमध्ये 5,910mAh बॅटरी मिळेल. दोन्ही स्मार्टफोन्स MediaTek Dimensity 9400 chipset आणि Hasselblad-backed कॅमेरा युनिटनं सुसज्ज असतील.

फोटो आणि व्हिडिओंसाठी, Oppo Find : प्रो व्हेरियंटमध्ये अल्ट्रावाइड शूटर आणि Sony LYT-600 सेन्सरसह 50-megapixel LYT-808 मुख्य सेन्सर आणि 50-megapixel Sony IMX858 पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे, जो 6x ऑप्टिकल झूमसह येतो. इंटरनल स्टोरेजबद्दल बोलायचं झाले तर, यात 16GB रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेजसह MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर असेल. हा फोन Android 15 आधारित ColorOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

कॅमेरा सेटअप कसा असेल? : Oppo Find X8 मध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसेल. तसेच, Find X Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एक 50MP मुख्य सेन्सर, दोन 50MP पेरिस्कोप लेन्स आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील आहे. बॅटरी लाइफबद्दल बोलायचं झाल्यास, Oppo Find X8 मध्ये 5630mAh बॅटरी आहे, तर Find X8 Pro मध्ये 5910mAh बॅटरी आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या बॅटरी 80 वॅट फास्ट चार्जिंग आणि 50MP वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. दोन्ही फोनमध्ये वायफाय, जीपीएस, ड्युअल सिम स्लॉट, 5जी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ऑडिओ जॅक आणि ब्लूटूथ सारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

हे वाचलंत का :

  1. मारुतीनं लॉंच केली नवीन जनरेशन डिझायर 2024, जबरदस्त फीचर्ससह जाणून घ्या किंमत..
  2. Google Maps मध्ये "जेमिनी"AI फिचर, काय आहे खास?
  3. 'या' देशात गुगल स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.