हैदराबाद : OpenAI आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या वर्षाच्या अखेरीस नविन अपडेट मॉडेल लॉंच करण्याच्या तयारीत नसल्याची माहिती समोर आली आहे. OpenAI चे पुढील फ्रंटियर मॉडेल GPT 4 AI मॉडेलपेक्षा अधिक शक्तिशाली तसंच सक्षम असणार आहे, असं एका अहवालात म्हटलं होतं. मात्र, कंपनीनं त्यास नकार दिलाय. कंपनी येत्या डिसेंबरमध्ये AI रिलीझ करण्याची योजना आखत आहे, असल्याच्या चर्चा होत्या. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. एआय मॉडेल प्रथम सार्वजनिक डोमेनमसाठी वापरता येणार नाहीय, अशी देखील चर्चा होती.
नवीन एआय मॉडेलमध्ये काय असणार : द व्हर्जच्या अहवालानुसार, एआय फर्म आपल्या फ्रंटियर लार्ज लँग्वेज मॉडेलच्या पुढील आवृत्तीसाठी डिसेंबर 2024 ची अंतिम मुदत ठरवत असल्याचं म्हटलं होतं. या मॉडेलचं अंतर्गत नाव ओरियन असं ठेवण्यात आल्याची माहिती होती. विशेष म्हणजे, सुरुवातीला याला स्ट्रॉबेरी असं म्हटलं जात होतं, परंतु ते GPT 4o AI मॉडेल असल्याचं निष्पन्न झालंय.
GPT 4 पेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली : मायक्रोसॉफ्टचे अभियंते नोव्हेंबरच्या सुरुवातीस OpenAI चे नवीन AI मॉडेल Orion ऑन Azure लॉंच करण्याच्या तयारीत नसल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांना सांगितलंय. ओरियनला GPT 4 चं उत्तराधिकारी मानलं जात होतं. परंतु त्याला GPT 5 म्हटलं जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नव्हतं. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं ओरियनचं वर्णन GPT 4 पेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली असल्याचं सांगितलं होतं. ओपनएआयचे उद्दिष्ट शेवटी त्याच्या मॉडेल्सना एकत्रित करून आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI) तयार करण्याचं होतं.
6.6 अब्ज डॉलचा निधी : ओपनएआयसाठी हे मॉडेल महत्त्वाचं ठरणार आहे. ओपनएआयनं ओरियन मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी o1, 'स्ट्रॉबेरी' या सांकेतिक नावाचा वापर केलाय. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम ऑल्टमन यांनी याबाबत X वर एक पोस्ट देखील केली होती. हे मॉडेल रिलीझ OpenAI साठी महत्त्वाचं होतं. कारण अलीकडेच त्यांनी $6.6 अब्ज (अंदाजे रु 554.88 अब्ज) निधी यासाठी उभारला होता. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्यानं या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
हे वाचलत का :