ETV Bharat / technology

OpenAI नं लाँच केलं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल; मैत्रिणीप्रमाणे मारेल गप्पा अन् बरंच काही - OpenAI GPT4o New Model

OpenAI GPT-4o : ओपनएआयनं आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फ्लॅगशिप मॉडेल GPT-4o लाँच केलंय. या नवीन मॉडेलबद्दल कंपनीनं दावा केलाय की ते GPT-4 लेव्हल इंटेलिजन्ससह येतं. इतकंच नाही तर हे मॉडेल अधिक वेगानं काम करतं.

OpenAI GPT4o New Model
ओपनएआयचे नवीन फ्लॅगशिप मॉडेल (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 1:12 PM IST

Updated : May 14, 2024, 2:59 PM IST

हैदराबाद OpenAI GPT4o : ओपनएआय, पॉप्युलेट चॅटबॉट चॅटजीपीटीच्या निर्मात्यानं आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फ्लॅगशिप मॉडेल GPT-4o लाँच केलंय. या नवीन मॉडेलबाबत कंपनीनं दावा केलाय की, हे मॉडेल GPT-4 लेव्हल इंटेलिजन्ससह उच्च वेगानं काम करतं. तसंच नवीन मॉडेल व्हिडिओ, व्हॉइस आणि मजकूर संदर्भात सर्वोत्तम असल्याचंही कंपनीनं म्हटलंय. याचाच अर्थ हे एआय मॉडेल केवळ मजकूर आणि ध्वनीच नाही तर इमेज आणि व्हिडिओंनादेखील समजू शकतं. तसंच तुमच्या प्रश्नांनाही ते रिअल टाईम उत्तरं देऊ शकतं.

मैत्रिणीप्रमाणे मारेल गप्पा : यासंदर्भात ओपन एआयनं एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये GPT-4o कसं काम करतं यासंदर्भात माहिती दिली आहे. या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळेल की एक व्यक्ती या एआय टूलसोबत जसं आपण आपल्या मैत्रिणीशी गप्पा माराव्या त्याप्रमाणे बोलतोय. इतकंच नाही तर हे टूल त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून काय झालंय असंही विचारतंय.

मिळणार फ्री अ‍ॅक्सेस : सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून GPT-4o बद्दल माहिती दिली आहे. "नवीन मॉडेल सर्व चॅटजीपीटी वापरकर्त्यांसाठी असून यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. तसंच जगातील सर्वात अत्याधुनिक एआय टूल बनवून, ते मोफत आणि जाहिरातींशिवाय उपलब्ध करणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे," असंही ऑल्टमॅननं म्हटलंय

नवीन मॉडेलचा उपयोग केव्हापासून करता येणार : GPT-4o मॉडेल आता सर्व ChatGPT वापरकर्त्यांसाठी (मर्यादित वापरासह) उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, मॉडेल्स ChatGPT Plus आणि Teams वापरकर्ते ते वापरू शकतात. तसंच हे वैशिष्ट्य लवकरच एंटरप्राइझ वापरकर्त्यांसाठी सादर केलं जाईल. यात चॅटजीपीटी प्लस वापरकर्त्यांना विनामूल्य वापरकर्त्यांपेक्षा 5 पट अधिक संदेश मर्यादा असेल. याव्यतिरिक्त, टीम आणि एंटरप्राइझ वापरकर्त्यांसाठी काही मर्यादा असतील. ओपनएआयचे म्हणणं आहे की, नवीन मॉडेल GPT-4o इमेज शेअरिंगसह चांगल्याप्रकारे संवाद साधते. दरम्यान, ChatGPT आता 50 पेक्षा जास्त भाषांना सपोर्ट करते. यामध्ये हिंदी, बंगाली, तमिळ, बंगाली या भारतीय भाषांचाही समावेश आहे.

हेही वाचा -

  1. एआय आधारित बनावट आणि व्हॉईस क्लोनिंग टाकू शकतो लोकसभा निवडणुकीवर प्रभाव, ते कसं टाळणार? - Lok Sabha Election 2024
  2. मानवी मूर्खपणा अन् प्रगती दरम्यान AI चा भविष्यातील प्रवास कसा असेल?
  3. महाराष्ट्र सरकारची AI ला साथ; महाराष्ट्र शासनाचा गुगलसोबत सामंजस्य करार

Last Updated : May 14, 2024, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.