ETV Bharat / technology

मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी, नंतर द्यावे लागतील पैसे - FREE AADHAAR UPDATE

मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमच्याकडं फक्त 3 दिवस बाकी आहे. या चार दिवसात तुम्ही आधार कार्ड अपडेट न केल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 11, 2024, 7:01 AM IST

हैदराबाद : आधार कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्ही अजून तुमचं आधार अपडेट केलं नसेल तर, तुम्हाला लवकर आधार अपडेट करण्याची गरज आहे. कारण सध्या आधार अपडेटचं काम मोफत केलं जात आहे. तुमच्याकडं मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त चार दिवसाची संधी आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क द्यावं लागेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे UIDAI नं आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.

मुदत वाढवण्याची कमी शक्यता : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली आहे. यामुळं आता शेवटच्या तारखेची वाट न पाहता तुम्ही तत्काळ अधार कार्ड करायला हवं. यापूर्वी 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत तारीख वाढवण्यात आली होती. नंतर पुन्हा 14 सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवण्यात आली. यानंतर, त्यात आणखी 14 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आहे.

कसं करणार ऑनलाइन अपडेट :

  • https://uidai.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करा.
  • आता होमपेजवर दिसणाऱ्या My Aadhaar पोर्टलवर जा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळालेला OTP वापरून येथे लॉग इन करा.
  • आता तुमचे तपशील तपासा आणि ते बरोबर असल्यास, योग्य बॉक्सवर खूण करा.
  • माहिती चुकीची असल्याचं आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडा.
  • त्यानंतर कागदपत्र अपलोड करा.

'या' अपडेट्ससाठी आधार केंद्रावर जा : लक्षात ठेवा की काही अपडेट्स ऑनलाइन न करता केंद्रावर जाऊन करावं लागेल. यामध्ये, जर तुम्हाला बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असल्यास आधार केंद्रावर जावं लागेल.

मुदत संपल्यानंतर शुल्क आकारणार : आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी या निश्चित मुदतीनंतर (आधार अपडेट डेडलाइन) हे महत्त्वाचं काम करण्यासाठी तुम्हाला UIDAI नं निश्चित केलेले शुल्क भरावं लागेल, जे 50 रुपये आहे. विशेष गोष्ट अशी आहे की UIDAI द्वारे दिलं जाणारे माझं आधार कार्ड अपडेट करण्याची ही मोफत सेवा फक्त माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे.

हे वचालंत का :

  1. आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढली, आधार कार्ड अपडेट न केल्यास पडणार महागात
  2. आधार, पॅन कार्डबाबत केंद्र सरकाचा मोठा निर्णय; उचललं 'हे' पाऊल - Aadhaar PAN Card
  3. फेक कॉल, क्रेडिट कार्डसह आधार कार्डच्या नियमात एक सप्टेंबरपासून मोठे बदल; खिशाला कात्री लागणार - New Rules From 1 September 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.