हैदाराबाद Nobel Prize in Chemistry : रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हॅसाबिस आणि जॉन जम्पर यांना प्रथिने संशोधनासाठी जाहीर करण्यात आलं आहे. रसायनशास्त्रातील 2024 चे नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर यांना "कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाइनसाठी" आणि डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना "प्रोटीन संरचनासाठी" जाहीर करण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सेसनं बुधवारी ही घोषणा केलीय.
प्रथिनांची रहस्ये उघड : रसायनशास्त्रातील या वर्षीचे नोबेल पारितोषिक विजेत्यांनी संगणकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे प्रथिनांची रहस्ये उघड केली आहेत. 2024 रसायनशास्त्र विजेते डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांनी जवळजवळ सर्व ज्ञात प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वीपणे वापर केला आहे. या वर्षीचे रसायनशास्त्र विजेते डेव्हिड बेकर यांनी जीवनाच्या बिल्डिंग ब्लॉक्सवर प्रभुत्व कसं मिळवायचं आणि पूर्णपणे नवीन प्रथिने कशी तयार करायची, हे शिकलं आहे. त्यांच्या शोधांची क्षमता प्रचंड आहे, असं अकादमीनं म्हटलंय.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2024
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2024 #NobelPrize in Chemistry with one half to David Baker “for computational protein design” and the other half jointly to Demis Hassabis and John M. Jumper “for protein structure prediction.” pic.twitter.com/gYrdFFcD4T
यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल (Nobel Prize in Chemistry 2024) दोन जणांना विभागून देत असल्याची माहिती रॉयल स्वीडिश अकादमीने दिली आहे. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा शुक्रवारी होणार असून अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा 14 ऑक्टोबरला होणार असल्याचं अकादमीनं म्हटलं आहे.
The 2024 #NobelPrize laureates in chemistry Demis Hassabis and John Jumper have successfully utilised artificial intelligence to predict the structure of almost all known proteins.
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2024
In 2020, Hassabis and Jumper presented an AI model called AlphaFold2. With its help, they have… pic.twitter.com/Izgx4FT23K
हे वाचलंत का :