हैदराबाद 2025 टोयोटा कॅमरी इंडिया लॉंच : टोयोटा किर्लोस्कर मोटरनं भारतात आपली प्रीमियम सेडान कार लॉंच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. नवीन कॅमरी सेडान भारतात लॉंच होणार आहे. ही कार विदेशी बाजारपेठेत एका वर्षापूर्वीच लॉंच झालीय. नवीन कार सादर करण्यापूर्वी कंपनीनं कारचा अधिकृत टीझर जारी केला आहे. कॅमरी 11 डिसेंबर रोजी म्हणजे उद्या भारतात लाँच होणार आहे. नवीन कॅमरीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये नवीन डिझाइन आणि अनेक हाय-टेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
2025 टोयोटा केमरी : नवीन टोयोटा कॅमरीची शैली आणि डिझाइन पूर्वीपेक्षा खूपच वेगळी असणार आहे. याला नवीन हेडलॅम्प देण्यात आले आहेत, यात सी-आकाराचे डीआरएल देखील चांगले दिसताय. त्याच्या पुढच्या भागात एक काळी पट्टी देण्यात आली आहे, जी संपूर्ण पुढच्या भागाला घेरते. कारला हनीकॉम्ब पॅटर्नची नवीन ग्रिल देण्यात आली आहे.
2025 टोयोटा कॅमरी डिझाइन : नवीन पिढीच्या कॅमरीची रूपरेषा जुन्या मॉडेलसारखीच आहे, परंतु ती पूर्णपणे नवीन कारसारखी दिसेल. याचे कारण म्हणजे स्टाइलिंग अपग्रेड्स ती वेगळी दिसणार आहे. त्याचा पुढचा आणि मागचा भाग पूर्वीपेक्षा खूपच शार्प करण्यात आला आहे. याशिवाय, यात नवीन टेललॅम्प आणि नवीन डिझाइन केलेले बंप देखील आहेत.
टोयोटा कॅमरी वैशिष्ट्ये : टोयोटा नवीन कॅमरीसह अनेक हाय-टेक फीचर्स देणार आहे. याला आधीच्या मॉडेलपेक्षा एक अतिशय प्रगत 12.3-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळणार आहे. कारचा डॅशबोर्ड स्वच्छ आणि हाय-टेक फीचर्सनं सुसज्ज आहे. कारच्या टॉप मॉडेलला पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळणार आहे.
टोयोटा केमरी किंमत : जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या कारची जवळपास सर्व वैशिष्ट्ये भारतीय मॉडेलमध्ये पाहायला मिळणार आहेत. यामध्ये 9-स्पीकर JBL ऑडिओ सिस्टम, हवेशीर जागा, 360-डिग्री कॅमेरा आणि टोयोटा सेन्स 3.0 यांचा समावेश आहे. नवीन पिढीच्या कॅमरीची अंदाजे किंमत सुमारे 45 ते 50 लाख रुपये असेल असा अंदाज आहे.
टोयोटा केमरी इंजिन : 2025 Toyota Camry मधील सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन 2.5-लिटर इंजिन असून ते हायब्रिड आहे. या शक्तिशाली इंजिनला एक मजबूत हायब्रिड प्रणाली मिळणार आहे. यातील शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर 222 bhp पॉवर निर्माण करते. ही शक्ती मागील मॉडेलपेक्षा 8 bhp अधिक आहे.
हे वाचलंत का :