ETV Bharat / technology

M4 चिपसेटसह नवीन MacBook लाँच होणार

Apple नवीन M4 चिपसेटसह मॅकबुक प्रो, iMac आणि Mac मिनी मॉडेल्सची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Apple
Apple (Etv Bharat MH DESK)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 25, 2024, 4:54 PM IST

हैदराबाद Apple Event OCT 2024 : 28 ऑक्टोबर रोजी Apple इव्हेंट होणार आहे. ज्यामध्ये Apple नवीन M4 चिपसेटसह iMac, MacBook Pro तसंच Mac mini लॉन्च करण्याची शक्यता आहे. ऍपलनं जाहीर केलं, की पुढील आठवड्यात नवीन मालिका जाहीर केली जाईल. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं एक टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, याबाबत अद्याप अचूक माहिती समोर आलेली नाहीय. एका अधिकाऱ्यानं मॅक लाइनअपच्या अपडेटचे संकेत दिले आहेत.

ऍपल कंपनी पुढील आठवड्यात, ऑक्टोबर 28 पासून विविध हार्डवेअरची घोषणा करेल. यावेळी घोषणा एका दिवसाच्या कार्यक्रमाऐवजी संपूर्ण आठवडाभर चालण्याची शक्यता आहे. यात Mac शी संबंधित अद्यतने समाविष्ट असू शकतात. - ग्रेग जोसविक, वरिष्ठ उपाध्यक्ष मार्केटिंग विभाग

M4 चिपसेट : Apple नं अखेरीस iMac, MacBook Pro आणि Mac mini मध्ये नवीन M4 चिप वापण्याचे संकेत दिले आहे. कंपनीने एक महिन्यापूर्वी iPhone 16 मालिका, AirPods आणि Apple Watch यासारख्या नवीन उत्पादनांचं लॉंच केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. Apple नं आपला नवीनतम सिलिकॉन चिपसेट, M4, या उन्हाळ्यात नवीन iPad Pro मॉडेल्ससह सादर केली होती, जी आता 14 आणि 16-इंच मॅकबुक प्रो मॉडेल्समध्ये समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. अलिकडच M4 चिपसेटसह MacBook Pro ची झलक YouTube वर लीक झाली आहेत, जे आतापर्यंतच्या Apple लीकपैकी एक मानलं जात आहे.

Apple Intelligence : याव्यतिरिक्त, Apple Intelligence, iPhone आणि AI वैशिष्ट्य, iOS 18.1 अद्यतनासह रिलीझ केले जाण्याची अपेक्षा आहे. जूनमधील WWDC 2024 इव्हेंटमध्ये या वैशिष्ट्यांची प्रथम चर्चा करण्यात आली होती. कंपनीने ऑक्टोबरमध्ये Apple इंटेलिजेंस रिलीज करण्याचं वचन दिलं होतं.

हे वाचलंत का :

  1. ECI चं सुविधा 2.0 मोबाईल ॲप लॉंच, घरबसल्या मिळणार परवानगी
  2. OpenAI डिसेंबरपर्यंत ओरियन AI मॉडेल लॉंच कण्याची शक्यता
  3. महिंद्रानं नवीन क्रॅश चाचणी प्लेट आणि बॅटरी सेल संशोधन प्रयोगशाळेचं केलं उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.