हैदराबाद users create sticker on WhatsApp : व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. ज्याच्या मदतीनं वापरकर्ते स्वतः स्टिकर पॅक तयार करून शेअर करू शकता. आतापर्यंत व्हॉट्सॲप वापरकर्त्यांकडं स्टिकर्स डाउनलोड करण्याचे दोन पर्याय होते. पहिलं व्हॉट्सॲपचे स्टिकर पॅक आणि दुसरे थर्ड पार्टी स्टिकर पॅक. पण आता यूजर्स त्यांचं आवडतं स्टिकर पॅक व्हॉट्स ॲपमध्येच तयार करता येणरा आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
स्टिकर्स शेअर करण्याचं स्वातंत्र्य : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप एक फीचर आणण्याची तयारी करत आहे. ज्यामुळं यूजर्स ॲपमध्येच स्टिकर पॅक तयार करू शकतील. रिपोर्टनुसार, नवीन फीचर WhatsApp Android साठी लेटेस्ट बीटा व्हर्जन 2.24.25.2 सह रोल आउट होत आहे. यामुळं वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपच्या डीफॉल्ट स्टिकर्सव्यतिरिक्त त्यांचे स्टिकर्स शेअर करण्याचं स्वातंत्र्य मिळेल.
कसं काम करणार नवीन वैशिष्ट्य ? : नवीन वैशिष्ट्यासह, वापरकर्ते कोणत्याही चॅटमध्ये स्टिकर पॅक उघडू शकतात. तसंच प्रत्येक स्टिकर पॅकसाठी एक नवीन तीन-बिंदू मेनू पर्याय दिसेल. या मेनूमधून, वापरकर्ते विद्यमान चॅटसह स्टिकर पॅक शेअर करू शकतात, किंवा काढून टाकू शकता.
स्टिकर तयार करणं झालं सोपं : संपूर्ण स्टिकर पॅक शेअर केल्यानं प्रक्रिया सुलभ होईल. वापरकर्त्यांना यापुढं प्रत्येक स्टिकर स्वतंत्रपणे पाठवण्याची गरज नाही, जे वेळ घेणारं काम आहे. एकदा हे वैशिष्ट्य पूर्णपणे आल्यावर, वापरकर्ते संपूर्ण कलेक्शन एकाच वेळी पाठवू शकतील. हे प्राप्तकर्त्यासाठी संपूर्ण पॅक त्यांच्या लायब्ररीमध्ये एका टॅपमध्ये तयार करणं सोपं होईल. थर्ड-पार्टी स्टिकर पॅक शेअर करण्याचा प्रयत्न करताना काही बीटा टेस्टर्सना एरर मेसेज आले आहेत. त्यामुळं आता ॲप व्हॉट्सॲप वरच स्टिकर तयार करू शकता.
हे वाचलंत का :