फ्लोरिडा Jupiter moon Europa : पृथ्वीवर जीवसृष्टी विपुल प्रमाणात आहे, परंतु आपल्याला अशीच जीवसृष्टी अद्याप विश्वात कोठेही सापडलेले नाही. गुरूचा चंद्र युरोपामध्ये हे आवश्यक घटक असू शकतात आणि हा चंद्र पृथ्वीइतकाचं जुना आहे. नासा युरोपाचा तपशीलवार शोध घेण्यासाठी आणि भूगर्भातील समुद्रासह बर्फाळ चंद्रावर जीवनाचा शोध घेण्यासाठी केनेडी स्पेस सेंटरमधून गुरूच्या दिशेनं एक अंतराळयान सोमवारी प्रक्षेपित होणार आहे. या दूरच्या ग्रहाभोवती फिरत असलेल्या युरोपातील चंद्रावर जीवनचा शोध घेण्याचा नासा प्रयत्न करणार आहे.
गुरूच्या चंद्रावर विशाल महासागर : गुरू ग्रहाच्या चंद्रावर गोठलेल्या खाऱ्या पाण्याचा विशाल महासागर आहे. त्यामुळं तिथं जीवन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. NASA चे प्रमुख अंतराळयान 'युरोपा क्लिपर' मिशन, यूएस स्पेस एजन्सीनं ग्रहांच्या मोहिमेसाठी विकसित केलेलं सर्वात मोठं अंतराळयान आहे. हे यान यापूर्वी प्रक्षेपित होणं अपेक्षित होतं, परंतु 9 ते 10 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील चक्रीवादळ मिल्टनमुळं या मोहिमेला विलंब झालाय.
गुरुत्वाकर्षणाचा वेगासाठी वापर करणार : क्लिपर आणि स्पेसएक्स फाल्कन हेवी रॉकेट दोन्ही नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये लॉन्च पॅडजवळ स्पेसएक्स हॅन्गरमध्ये सुरक्षित करण्यात आलं होतं, असं एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी एक्स वर सांगितलं. हे अंतराळ यान फेब्रुवारी 2025 मध्ये मंगळावरून उड्डाण करण्याची योजना आखत आहे. नंतर डिसेंबर 2026 मध्ये यान पृथ्वीवजवळून परत जाणार आहे. प्रत्येक ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून त्याचा वेग वाढवला जाणार आहे. या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीनं युरोपा क्लिपर एप्रिल 2030 मध्ये गुरू ग्रहावर पोहोचण्यासाठी आवश्यक वेग गाठेल, असं नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
2030 गुरूवर पोहचण्याची शक्यता : 14 एप्रिल, 2023 रोजी, युरोपियन स्पेस एजन्सीनं गुरूसह त्याचे तीन मोठे चंद्र, गॅनिमेड, कॅलिस्टो, युरोपा यांचा अभ्यास करण्यासाठी फ्रेंच गयाना येथील युरोपच्या स्पेसपोर्टवरून ज्युपिटर चंद्र एक्सप्लोरर (ज्यूस) मिशन लाँच केलं होतं. जुलै 2030 त्याचं गुरूवर पोहचणं अपेक्षित आहे. युरोपा क्लिपर अंतराळयान 1.8 अब्ज मैल (2.9 अब्ज किलोमीटर) प्रवास करेल. या फ्लायबाय दरम्यान, अंतराळ यानाची नऊ विज्ञान उपकरणं चंद्राचं वातावरण, बर्फाचं कवच आणि त्याखालील महासागराचा डेटा गोळा करतील. सुमारे 10-फूट-रुंद (3-मीटर) डिश-आकाराचा अँटेना आणि अनेक लहान ऍन्टेना पृथ्वीवर डेटा प्रसारित करतील, असं नासानं सांगितलं.
गुरुच्या चंद्राचा अभ्यास करणार : "युरोपा क्लिपर मिशन पृथ्वीवर जीवन कसं विकसित झालं हे समजून घेण्यास मदत करेल,"असं NASA नं म्हटलं आहे. युरोपा क्लिपर उपकरणांमध्ये कॅमेरे, स्पेक्ट्रोमीटर, मॅग्नेटोमीटर आणि बर्फ-भेदक रडार यांचा समावेश आहे. ही उपकरणे युरोपाचं बर्फाळ कवच, त्याखालील महासागर आणि चंद्राच्या वातावरणातील वायूंची रचना आणि भूपृष्ठावरील भूगर्भशास्त्रांता अभ्यास करतील. उष्ण बर्फाची ठिकाणं आणि पाण्याच्या बाष्पाच्या संभाव्य उद्रेकाची ठिकाणं शोधण्यासाठी अवकाशयानामध्ये थर्मल इन्स्ट्रुमेंट देखील असेल. युरोपाच्या कवचाखालील महासागर हे पृथ्वीवरील सर्व महासागरांच्या एकत्रित आकारमानाच्या दुप्पट आहे, असं अमेरिकेच्या अंतराळ संस्थेनं सांगितलं.
1610 मध्ये गुरूचं पहिल्यांदा निरिक्षण : नासा, जेट प्रोपल्शन लॅब आणि जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबचे शास्त्रज्ञ नासाच्या युरोपा क्लिपर मिशनमध्ये सहभागी आहेत. 1610 मध्ये, गॅलिलिओ गॅलीलीनं घरगुती दुर्बिणीनं गुरूचं पहिलं तपशीलवार निरीक्षण केलं होतं. NASA चं पहिलं अंतराळ यान, पायोनियर 10 हे गुरू ग्रहावार 21 महिन्यांच्या मोहिमेसाठी डिझाइन केलं गेलं होतं. तरीही ते 30 वर्षांहून अधिक काळ टिकलं. या यानानं जानेवारी 2003 मध्ये 7.6 अब्ज मैल अंतरावरून पृथ्वीला शेवटचा सिग्नल पाठवला होता.
हे वाचलंत का :