ETV Bharat / technology

पृथ्वीवर प्रथमच विद्युत क्षेत्राचा लागला शोध, 60 वर्षांच्या प्रयत्नांना यश - Electric Field on Earth - ELECTRIC FIELD ON EARTH

Electric Field on Earth : नासानं पृथ्वीच्या विद्युत क्षेत्राचा पहिला यशस्वी शोध लावलाय. हे विद्युत क्षेत्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय क्षेत्रासारखं आहे. NASA च्या एन्ड्युरन्स मिशननं पृथ्वीवरील विद्युत क्षेत्राची पुष्टी केलीय. यावरचं संशोधन नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

Electric Field on Earth
पृथ्वीच्या विद्युत क्षेत्राचा शोध (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 30, 2024, 12:31 PM IST

हैदराबाद Electric Field on Earth : अंतराळ एजन्सी NASA च्या शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकानं प्रथमच पृथ्वीवरील विद्युत क्षेत्राचा शोध लावला आहे. त्यांनी प्रथमच पृथ्वीवरील विद्युत क्षेत्राचं मोजमाप केलं आहे. जे पृथ्वीसाठी गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय क्षेत्राइतकंच महत्त्वाचं मानलं जातं. गेल्या 6 दशकांतील सर्वात मोठा हा नासाचा शोध आहे.

60 वर्षांपूर्वी मांडली संकल्पना : शास्त्रज्ञांनी शोधलेलं क्षेत्र 'अँबिपोलर इलेक्ट्रिक फील्ड' म्हणून ओळखलं जातं. शास्त्रज्ञांनी 60 वर्षांपूर्वी पृथ्वीवरील अशा प्रकारची प्रथम कल्पना केली होती. NASA च्या एन्ड्युरन्स मिशन रॉकेटच्या मोजमापांनी एम्बिपोलर फील्डच्या अस्तित्वाची पुष्टी केली आहे. तसंच त्याची ताकद मोजली आहे, ज्यामुळे वातावरणातील आयनोस्फियरला आकार देण्यामध्ये त्याची भूमिका दिसून येते.

असं केलं संशोधन : 1960 च्या दशकात पृथ्वीच्या ध्रुवावरून उडणाऱ्या यानांनी आपल्या वातावरणातून (अवकाशात) वाहणाऱ्या कणांचे प्रवाह शोधले आहेत. या प्रवाहाला संशोधकांनी 'ध्रुवीय वारा' असं नाव दिलंय. ज्यामुळं त्याची कारणे समजून घेण्यासाठी संशोधन सुरू झालं. हा ध्रुवीय वारा अधिक रहस्यमय होता. त्यातील बरेचसे कण थंड होते. त्यामुळं हे कण गरम होण्याची चिन्हे दिसत नव्हती. तरीही ते सुपरसॉनिक वेगानं प्रवास करत होते.

2016 मध्ये विशेष अंतराळयान : त्यावेळच्या तंत्रज्ञानानं हे शोधणे कठीण होतम, परंतु 2016 मध्ये कॉलिन्सन आणि त्यांच्या टीमनम पृथ्वीच्या द्विध्रुवीय क्षेत्राचम मोजमाप करण्यास सक्षम असं उपकरण शोधून काढलं. द्विध्रुवीय क्षेत्र हा एक असा प्रदेश आहे जिथं वरच्या वातावरणातील विद्युत क्षेत्र चार्ज केलेलं कण अवकाशात फिरू शकतात. विद्युत क्षेत्रानं आपल्या ग्रहाच्या उत्क्रांतीला आकार दिला असावा, असं या संशोधकांचं मत आहे.

हे वाचलंत का :

इस्रोच्या गगनयान मोहिमेत होणार माशांचा वापर - Gaganyaan 2025

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.