ETV Bharat / technology

महिंद्रा थार रॉक्सचं बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू, दसऱ्याला मिळणार डिलिव्हरी - Mahindra Thar Roxx booking

Mahindra Thar Roxx booking : महिंद्रानं 15 ऑगस्ट रोजी नविन थार Mahindra Thar Roxx लाँच केलीय. आता या 5 डोअर थारचं बुकिंग 3 ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्रीपासून सुरू होणार आहे. या कारमध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत? इंजिन कसं आहे?, जाणून घेऊया सर्व माहिती...

Mahindra Thar Roxx
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 27, 2024, 1:08 PM IST

हैदराबाद Mahindra Thar Roxx booking : Mahindra कंपनीनं नुकत्याच लाँच केलेल्या Mahindra Thar Roxx 4x4 च्या सर्व प्रकारांच्या किमती जाहीर केल्या आहेत. महिंद्रा थार रॉक्स 4x4 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिनसह लॉन्च करण्यात आलीय. त्याचे मॅन्युअल वेरिएंट इंजिन 150 bhp आणि 330 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यात महिंद्राची 4XPLOR प्रणाली आहे, जी इलेक्ट्रॉनिक लॉकिंग डिफरेंशियल आणि टेरेन मोड प्रदान करते.

Mahindra Thar Roxx
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra)

नवरात्रीमध्ये बुकिंग : तुम्ही Mahindra Thar Roxx खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही SUV नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून बुक केली जाऊ शकते. यासाठी कंपनी 3 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू करणार आहे.

Mahindra Thar Roxx
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra)

वितरण कधी सुरू होईल? : महिंद्राकडून या वाहनाची बुकिंग नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होईल, परंतु त्याची डिलिव्हरी 12 ऑक्टोबरपासून म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापासून सुरू होईल.

Mahindra Thar Roxx
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra)

इंजिन किती शक्तिशाली आहे? : महिंद्रानं थार रॉक्समध्ये दोन इंजिन पर्याय दिले आहेत. दोन-लिटर क्षमता असलेलं (TGDI), मेडलियन (RWD) इंजिन, आणि 2.2-liter mHawk (RWD आणि 4x4) इंजिन पर्याय ऑफर केले आहेत. दोन-लिटर इंजिनमधून 119 kW पॉवर आणि 330 न्यूटन मीटर टॉर्क मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मिळतो. तर 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर 130 kW पॉवर आणि 380 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो. 2.2-लिटर इंजिन पर्याय मॅन्युअल ट्रान्समिशनसह 111.9 kW पॉवर आणि 330 न्यूटन मीटर टॉर्क, 111.9 आणि 128.6 kW पॉवर आणि 6-स्पीड ऑटोमॅटिकसह 330 आणि 370 न्यूटन मीटर टॉर्क ऑफर करतो.

Mahindra Thar Roxx
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra)

काय आहे खास? : महिंद्रा थार रॉक्समध्ये कंपनीनं अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. यामध्ये ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग्ज, TPMS, पार्किंग सेन्सर्स, रियर कॅमेरा, ई-कॉल, SOS, रिअर डिस्क ब्रेक, ESC, EBD, ABS, हिल होल्ड, ESS, Adrenox कनेक्टेड कार, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, 26.03 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, 26.03 सेमी एचडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, सराउंड व्ह्यू कॅमेरा, लेव्हल-2 एडीएएस, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटो टेम्परेचर कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, ऑटो हेडलॅम्प्स, रिअर वायपर आणि वॉशर, कूल्ड ग्लोव्ह पुश बटण स्टार्ट, क्रूझ कंट्रोल, 18 आणि 19-इंच टायर, पॅनोरामिक सनरूफ, एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल, ड्युअल-टोन इंटीरियर, झिप आणि झॅप ड्रायव्हिंग मोड, बॉक्सच्या बाहेरची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Mahindra Thar Roxx
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra)

किंमत किती आहे? : कंपनीनं याला सहा व्हेरियंटसह लॉन्च केलं आहे. त्याच्या 2WD प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 20.49 लाख रुपये आहे. त्याच्या फोर-व्हील ड्राईव्ह व्हेरियंटच्या किंमती अजून जाहीर केलेल्या नाहीय.

Mahindra Thar Roxx
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra)

हे वाचलंत का :

  1. सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी घेतली टाटा सन्स, PSMC अधिकाऱ्यांची भेट - PM Narendra Modi
  2. Tata Motors दणका; कार मालकाला 16.95 लाख रुपये परत करण्याचे आदेश, काय आहे प्रकरण? - Hyderabad Nexon EV fire case
  3. आता वीज बिलापासून मिळवा मुक्ती : नागरिकांना मिळतेय मोफत वीज, घरबसल्या इथं करा अर्ज - Muft Bijli Yojan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.