हैदराबाद Highest Water Wading Capacity SUVs : देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूननं कहर केला असून सर्वत्र महापूर दिसत आहे. पुरात अनेक घरे, वाहनं आणि इतर वस्तू वाहून गेल्या आहेत. तुम्हीही पूरग्रस्त भागात राहत असाल, तर भारतात अशा काही SUV विकल्या जात आहेत ज्यांची वॉटर वेडिंग क्षमता खूप चांगली आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच पाच SUV बद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला अवघड रस्ते ओलांडण्यास मदत करू शकतात.
5. महिंद्रा थार : स्वदेशी एसयूव्ही कार पाचव्या स्थानावर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु याचं कारण म्हणजे या यादीतील इतर कारच्या तुलनेत महिंद्रा थारमध्ये सर्वात कमी वॉटर वेडिंग क्षमता आहे. कंपनीनं तिला 650 मिमी पर्यंत वॉटर वेडिंग क्षमता दिली आहे. या क्षमतेसह, ही एसयूव्ही ऑन-रोडिंग तसंच ऑफ-रोडिंगसाठी आवडती आहे.
4. फोर्स गुरखा : फोर्स गुरखा कार मजबूतीसाठी ओळखली जाते. फोर्स गुरखा हे ऑफ-रोडिंग आणि पाणी साचलेल्या भागात जाण्यासाठी देखील आदर्श कार मानली जाते. त्याची महिंद्रा थारपेक्षा 50 मिमी अधिक पाणीत जाण्याची क्षमता आहे. या कारची पाणी क्षमता 700 मिमी आहे. इतकंच नाही, तर तुम्हाला एवढी वॉटर वेडिंग क्षमता अगदी कमी किमतीत मिळते, जी खूपच आकर्षक आहे. या क्षमतेमुळं ती पूरग्रस्त रस्त्यावर सहज प्रवास करू शकते.
3. टोयोटा फॉर्च्युनर : फॉर्च्युनर ही भारतात विकली जाणारी एक एसयूव्ही आहे. जी तिच्या लक्झरीसह दमदारपणासाठी खूप पसंत केली जाते. यासोबतच ही एक अतिशय सक्षम एसयूव्ही आहे. फॉर्च्युनर वॉटर वेडिंग क्षमतेबद्दल बोलायचं झाल्यास, त्याची क्षमता 700 मिमी आहे. जी फोर्स गुरखा सारखीच आहे. यामध्ये डिझेल आणि पेट्रोल इंजिनचा पर्याय फॉर्च्युनर 4x2 आणि 4x4 व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. फॉर्च्युनरची मजबूत रचना आणि पाया ऑफ-रोडिंगसाठी तसंच पूरग्रस्त भागात चालण्यासाठी योग्य आहे.
2. जीप रँग्लर : जीप रँगलर पूरग्रस्त भागात प्रचंड लोकप्रिय आहे. यासोबतच या कारला 760 mm इतकी प्रभावी वॉटर वेडिंग डेप्थ आहे. या क्षमतेसह ती SUV यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रँग्लर 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि ऑफ-रोड वैशिष्ट्यांसह मानक आहे. रँग्लर ऑफ-रोडिंगसाठी डिझाइन केलेलं आहे. ज्यामुळं तुम्हाला पाणी साचलेल्या भागातून सहजतेनं जाता येतं.
1. लँड रोव्हर डिफेंडर : या यादीतील पहिल्या नंबरवर लँड रोव्हर डिफेंडर कारचा नंबर लागतो. जो भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व कारमधील सर्वाधिक वॉटर वेडिंग क्षमतेसह येते. 900 मिमीच्या सर्वात प्रभावी वॉटर वेडिंग क्षमतेसह डिफेंडर विकली जात आहे. ज्यामुळं ही कार खोल भागात सहज जाऊ शकते. यासोबतच यात 4x4 प्रणाली देण्यात आली आहे. ज्यामुळं ति अत्यंत धोकादायक ऑफ-रोडिंग देखील करण्यास सक्षम आहे.