ETV Bharat / technology

एमजी मोटरची विंडसर ईव्ही लाँच, 331 किमी रेंजसह अनेक फिचर - MG Motor launches Windsor EV

MG Motor launches Windsor EV : JSW MG Motor India आपली इंटेलिजेंट इलेक्ट्रिक क्रॉसओवर युटिलिटी व्हेईकल विंडसर आज भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. ज्यामध्ये अनेक फिचर देण्यात आले आहेत. MG Windsor EV मध्ये काय खास आहे, जाणून घ्या.

MG Motor launches Windsor EV
MG Motor launches Windsor EV (MG Motor)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 11, 2024, 5:24 PM IST

हैदराबाद MG Motor launches Windsor EV : JSW MG Motor India नं आज 11 सप्टेंबर रोजी आपली नवीन इलेक्ट्रिक कार Windsor EV लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक क्रॉसओवर युटिलिटी व्हेईकल (e-CUV) आहे. ही कार JSW आणि MG मोटर यांच्यातील भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या Windsor EV ची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, बॅटरी मॉड्यूलसाठी ग्राहकांना प्रति किमी 3.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

Windsor EV
विंडसर ईव्ही (MG Motor)

विंडसर ईव्ही बुकिंग सुरू : Windsor EV साठी बुकिंग आज सुरू झाली आहे. 25 सप्टेंबर 2024 पासून टेस्ट ड्राइव्ह सुरू होईल. ऑक्टोबरमध्ये त्याची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. EV आणि ZS EV मध्ये स्थित, विंडसर EV डिझाइन आणि अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह भारतातील पहीली CUV असल्याचं मानलं जातंय. MG Windsor EV एक्साईट, एक्सक्लुसिव्ह आणि एसेन्स सारख्या 3 प्रकारांमध्ये आणि 4 रंग पर्यायांमध्ये दिले आहेत.

Windsor EV
विंडसर ईव्ही (MG Motor)

विंडसर ईव्हीमध्ये फिचर : चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या Wuling Cloud EV वर आधारित, Windsor EV मध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. यात वायरलेस कनेक्टिव्हिटीसह 15.6-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याशिवाय, विंडसर ईव्हीमध्ये 360 डिग्री सराउंड कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ॲम्बियंट लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ आणि रिक्लाइन फंक्शनसह एअरलाइन स्टाइल रिअर सीट्स यांसारखे फिचर देण्यात आले आहेत. विंडसर ईव्ही लवकरच भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय होईल अशी कंपनीला आशा आहे.

Windsor EV
विंडसर ईव्ही (MG Motor)

हे वाचलंत का :

  1. मारुती सुझुकीच्या कारवर मिळतेय बंपर सूट, ग्राहकांचे वाचणार पैसे - discount on Maruti Suzuki cars
  2. Hyundai Alcazar लाँच ; स्मार्टफोन, स्मार्टवॉचच्या माध्यमातून दरवाजे होतील लॉक अनलॉक - Hyundai Alcazar facelift Launched
  3. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत 3 लाखांची कपात, मोफत चार्जिंग सुविधा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी - Tata Motors Festival EV Cars Offers

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.