हैदराबाद ISRO Venus Orbiter Mission: चांद्रयान 3 च्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) शुक्र ग्रहावर जाण्याच्या तयारीत आहे. या मिशनमध्ये यानाला ग्रहावर पोहोचण्यासाठी 112 दिवस लागतील, अशी माहिती इस्रोनं दिली आहे. व्हीनस ऑर्बिटर मिशन (VOM) असं त्याचं नाव आहे. हे यान लाँच करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शुक्रावर पोहोचण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न असेल. शुक्र ग्रहाचं वातावरण, पृष्ठभाग आणि भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या मिशनसाठी भारत सरकारनं 1 हजार 236 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
शुक्रावर जाण्याचा पहिला प्रयत्न : सर्व काही ठीक असल्यास शुक्रयान1 - 29 मार्च 2028 रोजी प्रक्षेपित केलं जाईल, असं ISRO नं म्हटलंय. ही मोहिम शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आली आहे. तसंच शुक्रावर जाण्याचा भारताचा पहिला प्रयत्न असेल. या मोहिमेत इस्रोचे शक्तिशाली LVM-3 (लाँच व्हेईकल मार्क 3) रॉकेट वापरण्यात येणार आहे. हे अंतराळ यान प्रक्षेपणानंतर 112 दिवसांनी 19 जुलै 2028 रोजी शुक्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल.
#ISRO's Venus Orbiter Mission (Shukrayaan) will launch BEFORE 29 March 2028!! 🎯
— ISRO Spaceflight (@ISROSpaceflight) October 1, 2024
VOM will be launched on an LVM3 into a 170×36,000 km Earth Parking Orbit. VOM will then perform several orbit raise burns, followed by the Earth-bound escape burn on March 29! + (1/2)🧵 pic.twitter.com/DB9GtJJTkH
शुक्रयान मोहिमेचं उद्दिष्ट : VOM चा उद्देश शुक्राचं वातावरण, पृष्ठभाग आणि भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करणं आहे. मिशनच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये ग्रहाची वातावरणीय रचना, पृष्ठभागाची वैशिष्ट्ये आणि संभाव्य ज्वालामुखी, भूकंपीय प्रक्रिया समजून घेणे आहे. हे यान शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी ऑर्बिटरमध्ये कृत्रिम छिद्र रडार, इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट कॅमेरे आणि सेन्सर्ससह अत्याधुनिक उपकरणे पाठवेल. ही उपकरणे शास्त्रज्ञांना शुक्राच्या घनदाट, कार्बन डायऑक्साइड समृद्ध वातावरणाचं रहस्य उलगडण्यात आणि ग्रहाच्या पृष्ठभागावर सक्रिय ज्वालामुखी असण्याची शक्यता शोधण्यात मदत करतील.
मिशनसाठी 1 हजार 236 कोटी रुपयांची तरतुद : इस्रोसोबतच रशिया, फ्रान्स, स्वीडन आणि जर्मनी या देशांचाही शुक्रयान-१ मोहिमेत सहभाग आहे. स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स (IRF) सूर्य आणि शुक्राच्या वातावरणातून येणाऱ्या कणांचा अभ्यास करण्यासाठी ISRO ला व्हीनसियन न्यूट्रल्स ॲनालिस्ट (VNA) साधन प्रदान करेल. भारत सरकारनं या मिशनसाठी 1 हजार 236 कोटी रुपयाची तरतुद केलीय. व्हीनस ऑर्बिटर मिशन भारताच्या अंतराळ संशोधन क्षमतेत वाढ करेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का :