नवी दिल्ली ISRO Aditya L1 : इस्रोच्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळालं आहे. इस्रोच्या वतीनं आदित्य एल 1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन लाँच करण्यात आलं होतं. या मोहिमेला मोठं यश मिळाल्यानं इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मोठं यश मानलं जात आहे. इस्रोला मिळालेल्या या यशानं अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. आदित्य एल 1 या मोहिमेत आदित्य एल 1 नं मंगळवारी आपल्या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण केला. पहिल्या सौर मोहिमेतील आदित्य-एल-1 अंतराळयानानं मंगळवारी सूर्य आणि पृथ्वी एल-1 बिंदूभोवती आपली पहिली कक्षा पूर्ण केली, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नं एका निवेदनात स्पष्ट केलं आहे.
आदित्य एल 1 मोहिमेची पहिली कक्षा पूर्ण : आदित्य एल 1 Aditya-L1 मिशनची Lagrange point L1 इथं स्थित भारतीय सौर वेधशाळा आहे. मागील वर्षी 2 सप्टेंबरला आदित्य एल 1 मोहीम लॉन्च करण्यात आली. त्यानंतर 6 जानेवारीला आदित्या एल 1 त्याच्या लक्ष्यित कक्षेत ठेवण्यात आलं. आदित्य-एल 1 अंतराळ यानाला प्रभामंडल कक्षेत L1 बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 178 दिवस लागतात. इस्रोनं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, हॅलो कक्षेत प्रवास करताना आदित्य एल 1 या अंतराळयानाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागेल, त्यानंतर आदित्य एल 1 हे त्याच्या कक्षेतून बाहेर पडेल.
दुसऱ्या हॅलो ऑर्बिट मार्गावर चालू राहील प्रवास : आदित्य एल 1 हे अंतराळयानाची कक्षा राखण्यासाठी 22 फेब्रुवारी आणि 7 जूनला दोन स्टेशन-कीपिंग ऑपरेशन्स घेण्यात आल्या. त्याचा प्रवास L1 च्या आसपासच्या दुसऱ्या हॅलो ऑर्बिट मार्गावर चालू राहील हे तिसऱ्या स्टेशन-कीपिंग ऑपरेशननं स्पष्ट केलं. त्यात म्हटलं आहे की, सूर्य आणि पृथ्वी L1 लॅग्रॅन्जियन बिंदूभोवती आदित्य L1 च्या या प्रवासात जटिल गतिशीलतेचं मॉडेल समाविष्ट आहे. तर इस्रोच्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, आदित्य-एल1 मोहिमेसाठी URSC-ISRO इथं विकसित केलेलं अत्याधुनिक फ्लाइट डायनॅमिक्स सॉफ्टवेअर पूर्णपणानं प्रमाणित झालं आहे.
हेही वाचा :