हैदराबाद iQOO Neo 10 : iQOO Neo 10 मालिका लॉंच होण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. ही स्मार्टफोन सीरीज 29 नोव्हेंबरला लॉंच होणार आहे. फोनचा कॅमेरा सध्या चर्चेत आहे, जो सोनी कंपनीचा आहे. हाच कॅमेरा Vivo X200 मध्ये बसवला आहे. Vivo X200 हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे, जो काही काळापूर्वी बाजारात लॉंच झालाय आहे.
29 नोव्हेंबर रोजी होणार लॉंच : iQOO Neo 10 29 नोव्हेंबर रोजी लॉंच होणार आहे. याआधी कंपनीनं Weibo वर फोनचा टीझर रिलीज केला होता. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये Sony IMX921 कॅमेरा सेंसर असेल. हाच सेन्सर Vivo X200 मध्ये देखील बसवला आहे. यात कस्टम-डिझाइन केलेलं ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील असेल. कंपनीनं फोनचे काही नमुनेही शेअर केले आहेत. याशिवाय आणखीही अनेक छान फीचर्स यात मिळू शकतात.
iQOO Neo 10 फोनचे तपशील : iQOO Neo 10 स्मार्टफोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनचा डिस्प्ले असेल. 144Hz रिफ्रेश दर असेल. हे स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 चिपसेटसह सुसज्ज असेल. Neo10 Pro मध्ये MediaTek Dimensity 9400 चिपसेट असू शकते. यात LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेज असेल.
8T LTPO डिस्प्ले पॅनेल : फोनमध्ये इन-हाउस Q2 चिप देखील मिळेल. ज्यामुळे गेमिंगचा दर्जा सुधारेल. यात सुपर-रिझोल्यूशन आणि फ्रेम रेट इंटरपोलेशन मिळू शकतं. दोन्ही मॉडेल्समध्ये 8T LTPO डिस्प्ले पॅनेल असतील, ज्यामध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. हा फोन iQOO Neo 9 मालिकेतील अपग्रेड असेल. तीन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये एक्स्ट्रीम शॅडो ब्लॅक, रॅली ऑरेंज आणि चिगुआंग व्हाईट यांचा समावेश आहे. 6100mAh बॅटरी असेल. डिव्हाइस 7.99mm जाडी आणि 199 ग्रॅम असेल.
हे वाचलंत का :