ETV Bharat / technology

iQOO 13 स्मार्टफोन 50MP ट्रिपल रेयर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8 Elite प्रोसेसरसह लॉंच

iQOO चा फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 13 Qualcomm च्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे.

iQOO 13
iQOO 13 (iQOO)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 3 hours ago

हैदराबाद : iQOO 13 नं अखेर चीनमध्ये Qualcomm च्या नवीनतम आणि शक्तिशाली प्रोसेसर Snapdragon 8 Elite सह सुसज्ज स्मार्टफोन लॉंच केला. हा स्मार्टफोन 6150mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आणला गेला आहे. यासोबतच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50 MP आहे. यासोबतच फोनमध्ये 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोन iQOO कंपनीच्या फ्लॅगशिप iQOO 12 ला रिप्लेस करेल, जो गेल्या वर्षी लॉंच झाला होता. कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन मायक्रो-वक्र किनार, 2K BOE LTPO डिस्प्लेसह लॉंच करण्यात आला आहे. यासोबतच हा फोन 120W फास्ट चार्जिंगसह येतो. येथे आम्ही तुम्हाला iQOO च्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल माहिती देत ​​आहोत.

iQOO 13 किंमत : iQOO 13 स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज सह CNY 3,999 (सुमारे 47,200 रुपये) लाँच करण्यात आला आहे. फोनचा दुसरा प्रकार 16 GB रॅम सह CNY 4,299 (सुमारे 50,800 रुपये) लाँच करण्यात आला आहे. यासह, 12GB + 512GB व्हेरिएंट CNY 4,499 (सुमारे 53,100 रुपये) आणि 16GB + 512GB व्हेरिएंट CNY 4,699 (सुमारे 55,500 रुपये) मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. त्याचा टॉप व्हेरिएंट 16GB + 1TB सह CNY 5,199 (सुमारे 61,400 रुपये) लाँच करण्यात आला आहे. iQOO चा हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन, ग्रे आणि व्हाईट या चार रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनी लवकरच हा फोन भारतीय बाजारातही लॉंच करणार आहे.

iQOO 13 डिस्प्ले : iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा 2K BOE Q10 FHD+ 8T LTPO 2.0 OLED Q10 डिस्प्ले आहे. त्याची कमाल ब्राइटनेस 1800nits आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 3168 X 1440 पिक्सेल आहे. रीफ्रेश दर 144Hz आहे. यासोबतच सेल्फी कॅमेरासाठी डिस्प्लेमध्ये पंच-होल कटआउट आहे.

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज : iQOO चा हा फोन Qualcomm Snapdragon 8 Elite chipset सह लॉंच करण्यात आला आहे. या फोननं AnTuTu बेंचमार्कवर 3 मिलियन स्कोअर केला आहे. यासोबत, फोनमध्ये गेमिंगसाठी इन-हाउस Q2 चिप आहे, जी पीसी-स्तरीय 2K टेक्सचर सुपर-रिझोल्यूशन आणि नेटिव्ह लेव्हल 144FPS सुपर फ्रेम रेट देते. हा फोन 16 GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजला सपोर्ट करतो.

ऑपरेटिंग सिस्टम : iQOO चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Android 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस OriginOS 5 वर चालतो.

कॅमेरा : iQOO 13 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या फोनचा प्राथमिक कॅमेरा 50MP Sony IMX921 आहे, जो OIS सपोर्टसह येतो. यासोबत, फोनमध्ये 50MP Samsung S5KJN1 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50MP Sony IMX816 टेलिफोटो लेन्स आहे. या iQOO फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यासोबतच चांगल्या इमेज क्वालिटीसाठी यात नाइस २.० अल्गोरिदम सपोर्ट करण्यात आला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग : कंपनीनं iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 6,150mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

इतर वैशिष्ट्ये : या फोनमध्ये कॅमेरा मॉड्यूलच्या आसपास एलईडी दिवे आहेत, ज्याला कंपनीनं एनर्जी हॅलो असं नाव दिलं आहे. हे 6 डायनॅमिक प्रभाव आणि 12 रंग संयोजनांना समर्थन देतं. यासह, फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर तसंच धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP69 + IP68 रेटिंग आहे. हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट कनेक्टिव्हिटीसह येतो.

हे वाचलंत का :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.