हैदराबाद Apple Glowtime Event : Apple सोमवारी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता Apple इट्स गोलटाईम इव्हेंट आयोजित करणार आहे. या कार्यक्रमादरम्यान कंपनी iPhone 16 सीरीज आणि 16 Pro सीरीज लॉन्च करेल. या कार्यक्रमादरम्यान, कंपनी इतर प्रोडक्ट्स देखील लॉन्च करणार आहे.
These are the expected iPhone 16 Pro colors. Which one would you pick?
— Apple Hub (@theapplehub) September 8, 2024
- Black Titanium
- White Titanium
- Natural Titanium
- Gold Titanium pic.twitter.com/AFpLPpLjxY
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहाणार : Apple Watch Series 10, Apple Watch Ultra 3 आणि Apple Watch SE मॉडेल या कार्यक्रमात लाँच होण्याची शक्यता आहे. Apple iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असेल. या क्रार्यक्रामाचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहावं, ते जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला ऍपलच्या 'इट्स ग्लोटाइम' इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं आणि कोणत्या वेळी पाहू शकता, हे सांगणार आहोत. ॲपलचा हा इव्हेंट तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट ॲपल टीव्ही आणि यूट्यूबवर थेट पाहू शकता. YouTube वर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी, तुम्हाला Apple चॅनलवर जावं लागेल.
'हे' iPhone होणार लाँच : Apple च्या या इव्हेंटमध्ये iPhone 16, 16 Plus, 16 Pro, 16 Pro Max लॉन्च केले जातील. गेल्या वर्षी आयफोन 15 आणि 15 प्रो सीरीज लॉन्च करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी अनेक त्यात बदल पाहायला मिळतील. या वर्षी कंपनी नवीन डिझाइन, नवीन कॅमेरा सेन्सर आणि चिपसेटमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
iPhone 16 मध्ये कॅमेरा सेटअप डिझाइन : iPhone 16 चा कॅमेरा सेटअप डिझाइन iPhone 11 च्या कॅमेरा डिझाइनसारखीच असण्याची शक्यता आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील कंपनी काळा, निळा, हिरवा, गुलाबी आणि पांढरा असे समान रंगात iPhone लॉंच करण्याची शक्यता आहे.
चांगला कॅमेरा सेटअप : आयफोन 15 च्या तुलनेत आयफोन 16 मध्ये वेगळ्या कॅमेरा डिझाइन व्यतिरिक्त, कॅमेरा सेन्सर्समध्ये बदल असू शकतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी अपग्रेडेड कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता आहे. iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे, जो 2X ऑप्टिकल झूमसह येतो, तर iPhone 16 च्या मानक प्रकारात नवीन 48-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड अँगल लेन्स मिळेल. यासोबतच कमी प्रकाशातील सेन्सरमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे.
या खास सुविधा मिळणार : आयफोन 16 मध्ये स्थानिक व्हिडिओ रेकॉर्डिंग सुविधा उपलब्ध असेल. हे वैशिष्ट्य सध्या केवळ iPhone 15 Pro मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षी प्रो वेरिएंटमध्ये दिलेले ॲक्शन बटण यावेळी स्टँडर्ड iPhone 16 मध्ये दिसू शकतं.
'हे' वाचंलत का :