ETV Bharat / technology

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज INS अरिघात नौदलात दाखल - INS Arighat Submarine

INS Arighat Submarine : अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अरिहंत वर्गातील दुसरी पाणबुडी नौदलात सामिल झालीय. विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणारी INS अरिघात नौदलात दाखल झाल्यामुळं भारतील नैदलाची ताकद वाढली आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 10 हजार किलोमीटरपर्यंत आहे. अमेरिकेजवळ 14 ओहायो-क्लास SSBN पाणबुडी असून ति K-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. तिची मारक क्षमता 750 किलोमीटर आहे.

INS Arighat Submarine
आयएनएस अरिघात पाणबुडी (Etv Bharat National Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 2, 2024, 9:41 AM IST

नवी दिल्ली INS Arighat Submarine : अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अरिहंत वर्गाचीस दुसरी पाणबुडी नौदलाला मिळाली. विशाखापट्टणम येथे अणुऊर्जेवर चालणारी 'INS अरिघात'ला नौदलात सामील करण्यात आलं. भारताची नौदल शक्ती आणि आण्विक प्रतिबंधक क्षमता वाढवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून 'INS परिघात'कडं पाहिलं जात आहे.

देशातील पहिली स्वदेशी बनावटीची पाणबुडी : न्यूक्लियर पॉवर्ड पाणबुडी (SSBN – Schiff, Submarine, Balistic, Nuclear) कार्यक्रम हा भारताचा अत्यंत गुप्त प्रकल्प आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नौदलात दाखल झालेल्या 'INS अरिघात'ची लांबी अंदाजे 112 मीटर आहे. देशातील पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी 'INS अरिहंत'चा प्रकल्प जुलै 2009 मध्ये सुरू झाला होता. तो 2016 मध्ये कार्यान्वित करण्यात आला होता.

83 MW प्रेशराइज्ड लाइट-वॉटर रिॲक्टर : नैदलातील दोन्ही पाणबुड्या 83 मेगावॅटच्या प्रेशराइज्ड लाइट-वॉटर अणुभट्ट्यांनी सुसज्ज आहेत. ज्यामुळं त्यांना दीर्घकाळ पाण्याखाली राहता येतं. तर, पारंपारिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या नियमित अंतरानं पृष्ठभागावर येतात. अचानक झालेल्या हल्ल्यात टिकून राहण्याच्या आणि प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेमुळं एसएसबीएन महत्त्वाची भूमिका बजावतात. अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या देशांकडं लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असलेली एसएसबीएनं शोधणेही कठीण आहे. चीनकडं JL-3 क्षेपणास्त्रांनी सज्ज सहा जिन-क्लास SSBN आहेत.

तीन टप्प्यात होणार निर्माण : या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 10 हजार किलोमीटरपर्यंत आहे. अमेरिकेकडं 14 ओहायो-क्लास SSBNs आहेत. यामध्ये अरिहंत वर्गाच्या पाच पाणबुड्या आणि सहा आण्विक हल्ला करण्यास सक्षम पाणबुड्यांचा समावेश आहे. या पाणबड्या तीन टप्प्यात तयार केल्या जाणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती दोन 6,000 टन 'शिकारी-किलर' SSN (अणुशक्तीवर चालणाऱ्या अटॅक पाणबुड्या) बांधण्यासाठी सुमारे 40 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर विचार करत आहे. हे टॉर्पेडो, जहाजविरोधी आणि जमिनीवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील. त्यांच्या बांधकामाला एक दशक लागण्याची अपेक्षा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.