ETV Bharat / health-and-lifestyle

महिनाभर गरम पाण्यात अद्रक घालून पिण्याचे आश्चर्यकारक फायदे - HEALTH BENEFITS OF GINGER WATER

आल्यामध्ये भरपूर जीवनसत्त्व, खनिजं आणि अँटीऑक्सिडंट असतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आलं मिसळून गरम पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.

BENEFITS OF DRINKING GINGER WATER  When Should Ginger Not Be Eaten    Benefits OF Ginger Water
अद्रक पाण्याचे फायदे (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Jan 25, 2025, 7:26 PM IST

Health Benefits Of Ginger Water: हिवाळ्यात आलं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे शरीर निरोगी राहते. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, आलं मिसळून गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. महिनाभर नियमितपणे आल्याचं पाणी प्यायल्यास आरोग्यवर्धक अनेक फायदे होतात. जाणून घेऊया आलं पाणी पिण्याचे फायदे.

आलं हे नैसर्गिकरित्या मिळणारे औषध आहे. अनेक शतकांपासून विविध आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी आल्याचा वापर केला जात आहे. आयुर्वेदिक ग्रंथातील सर्वात महत्त्वाची औषधी वनस्पती म्हणूण आल्याची ओळखं आहे. अनेक लोक रोजच्या चहामध्ये आलं घालतात. असं केल्यानं चहाची चव वाढते. तसंच घसादुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. भारतातील बहुतेक लोक विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचा वापर करतात. पदार्थांची चव वाढवण्यासाठी आल्याला मसाला म्हणून खूप महत्त्व आहे.

  • आल्याचं पाणी पिण्याचे फायदे: आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात. एक महिना रोज आल्याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आल्यामधील अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. अदरक सेवन केल्यास अपचन, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि मळमळाचा त्रास होत असलेल्या लोकांना आराम मिळतो. आल्यामध्ये तणाव आणि चिंता दूर करण्याची ताकद असते. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

अद्रकचे पाणी अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असलेले आहे. हे पाणी एक महिना प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी आल्याचं पाणी प्यायल्यानं चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे लठ्ठपणाही कमी होतो. तसंच भूकही कमी होते. दिवसभर जास्त खाण्यासारख्या समस्या दूर करते. परिणामी तुम्ही वजन कमी होतो.

  • चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते: वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणे हे आल्याचं एक गुणधर्म आहे. तसंच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणे हे देखिल आहे. आलं किंवा त्याचं पाणी किंवा आल्याचा चहा घेतल्यानं खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो. आलं हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं आहे. आल्यामधील जिंजरॉल हा एक प्रभावी घटक आहे. जो सांधे आणि स्नायू दुखी सारख्या समस्या कमी करण्यास मदत करतो. जिंजरॉलमध्ये प्रामुख्याने दाहक-विरोधी गुणधर्म असतात. संधिवात, स्नायू दुखणे, मासिक पाळीच्या समस्या कमी करते.

आल्याचं पाणी अँटिऑक्सिडंट्ससह त्वचेशी संबंधित समस्यांना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम करते. आल्याचं पाणी प्यायल्यानं बद्धकोष्ठता, जुलाब आणि गॅस्ट्रिकच्या समस्या दूर होतात. आल्याचं पाणी मळमळ आणि उलट्या कमी करते. आल्याचं सेवन मेथी किंवा पुदिनासोबत पाण्यात मिसळून करता येवू शकतो.

  • संशोधन काय म्हणते: नॅशनल लायब्ररीमधील जर्नलमध्ये प्रकाशित 2001 च्या अभ्यासानुसार, संधिवात असलेल्या लोकांना 4 आठवडे दररोज 2 ग्रॅम आलं दिलं गेलं. आल्याच्या वापराने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. संशोधनात असेही दिसून आलं आहे की, त्यात संयुक्त कार्य सुधारण्याची क्षमता आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. डेव्हिड ई. विल्यम्स यांनी या संशोधनात सहभाग घेतला.

आल्याचे औषधी गुणधर्म सांधेदुखी कमी करतात. उकळत्या पाण्यात आले आणि हळद टाकून सकाळी आल्याच्या चहाचे सेवन केल्यास चांगले परिणाम मिळतात. त्यामुळे दुखण्यासोबतच सर्दी-खोकल्याच्या समस्येपासूनही आराम मिळेल, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6616534/

हेही वाचा

  1. हे जीवनसत्त्व महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम; निरोगी राहाण्यासाठी आजच करा आहारात समावेश
  2. अशाप्रकारे करा शरीरातील 'व्हिटॅमिन बी 12' ची कमतरता पूर्ण
  3. 'या' समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही करू नये 'या' कॉफीचं सेवन
  4. लसूण कशाप्रकारे खाणं चांगलं? सोलून की छिलक्यासह
  5. ॲनिमियाच्या समस्येपासून सुटका हवी? आजच करा आहारात 'या' फळाचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.