हैदराबाद : कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai द्वारे ऑफर केलेल्या व्हेन्यूची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. त्यात कोणते बदल केले आहेत? किती शक्तिशाली इंजिन आहे. त्यात का फिचर आहेत?, किंमत काय आहे? या बातमीत आम्ही सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत.
साहसी आवृत्ती लाँच केली : Hyundai द्वारे Venue Adventure Edition भारतात लाँच करण्यात आली आहे. सणासुदीच्या आधी लॉन्च झालेल्या या एडिशनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ही आवृत्ती खास ग्राहकांसाठी तयार केली गेली आहे, ज्यांना साहस तसंच मैदानी थरार करायला आवडतात.
काय आहेत बदल : कंपनीकडून व्हेन्यूच्या ॲडव्हेंचर एडिशनमध्ये समोर लाल रंगाचं ब्रेक कॅलिपर, मागील बाजूस काळ्या रंगाच्या स्किड प्लेट्स, काळ्या रंगाचं छत, ORVMs आणि शार्क फिन अँटेना, डोअर क्लॅडिंग देण्यात आलं आहे. आतील भागात लाइट सेज ग्रीन इन्सर्ट दिलं आहे. या थीमवर ॲडव्हेंचर एडिशन सीट्स ठेवण्यात आल्या आहेत. SUV मध्ये मेटल पेडल्स, 3D मॅट आणि ड्युअल कॅमेरासह डॅशकॅम देखील आहे.
दोन इंजिन पर्याय उपलब्ध : Hyundai नं Adventure Edition Venue मध्ये दोन इंजिनांसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय दिले आहेत. यात मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. तर टर्बो आणि डीसीटी ट्रान्समिशनसह एक लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.
किती आहे किंमत : कंपनीनं नवीन एडिशन एस ऑप्शनल प्लस, एसएक्स आणि एसएक्स ऑप्शनल या पर्यायांमध्ये आणलं आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 10.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 13.38 लाख रुपये आहे. जर तुम्हाला एसएक्स आणि एसएक्स ऑप्शनल ट्रिममध्ये ड्युअल टोनचा पर्याय हवा असेल, तर अतिरिक्त 15 हजार रुपये देऊन त्याचा लाभ घेता येईल.
हे वाचलंत का :