ETV Bharat / technology

‘या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव

Maharashtra Assembly elections : तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तुम्ही तुमच्या घरी बसून सहज तपासू शकता. ते कसं तपासायचं चला जाणून घेऊया...

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 3 hours ago

Maharashtra Assembly elections
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat File Photo)

हैदराबाद Maharashtra Assembly elections : तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव तपासण्यासाठी अनेक पद्धती वापरू शकता. ज्यात ऑनलाइन पोर्टल, एसएमएस सेवा, मोबाइल ॲप, हेल्पलाइन नंबरचा समावेश आहे. या पद्धतींद्वारे तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे की, नाही याची खात्री सहज करू शकता, जेणेकरून तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय मतदान करता येईल.

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसंच झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 जागांवर निवडणूक विधानसभेची निवडणूक होणार असून झारखंडमध्ये 81 जागांवर निवडणूक पार पडेल. त्यामुळं तुम्हाला देखील या निवडणुकीत मतदान करायचं असेल, तर तुमच्याकडं मतदान कार्ड असणं गरजेचं आहे. मात्र, तुमचं नाव आगोदच मतदार यादीत असल्यासं ते ऑनलाईन कसं पहावं याबद्दल आज आपण जाणून घेऊया...

ऑनलाइन : National Voter Service Portal Elections24.eci.gov.in वर जाऊन तुम्ही ऑनलाइन मतदार यादीत तुमचं नाव तपासू शकता. यासाठी “मतदार यादीत आपलं नाव शोधा” वर क्लिक करा. येथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील.

Election Commission website
निवडणूक आयोग वेबसाईट (Election Commission)

EPIC क्रमांकानुसार शोधा : EPIC क्रमांक प्रविष्ट करा, जो तुमचा मतदार आयडी क्रमांक आहे.

वर्णनानुसार शोधा : तुमचं नाव, लिंग आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि शोधा.

मोबाईल नंबर : तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून तुमचं नाव देखील शोधू शकता. तुमची माहिती भरल्यानंतर, "शोध" वर क्लिक करा आणि तुमचं नाव मतदार यादीत दिसेल.

Election Commission website
निवडणूक आयोग वेबसाईट (Election Commission website)

एसएमएस : तुमच्याकडं EPIC क्रमांक असल्यास, तुम्ही एसएमएसद्वारेही मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून “ECI <space> EPIC number” लिहून 1950 वर पाठवावा लागेल. काही वेळातच तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही याची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळेल.

मोबाइल ॲप : तुम्ही स्मार्टफोन वापरत असल्यास, तुम्ही “व्होटर हेल्पलाइन” ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपद्वारे तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकत नाही, तर इतर मतदार सेवांचाही लाभ घेऊ शकता. हे ॲप वापरण्यास अतिशय सोपं आहे,

हेल्पलाइनसह इतर पर्याय : तुम्हाला ऑनलाइन किंवा एसएमएस सेवा वापरायची नसेल, तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या टोल फ्री क्रमांक 1950 वर कॉल करू शकता. ही सेवा विनामूल्य आहे. तुम्हाला IVR सूचनांचं पालन करावे लागेल. यानंतर, आवश्यक माहिती देऊन तुम्ही तुमच्या मतदार यादीची माहिती मिळवू शकता.

हे वाचलंत का :

  1. तुम्ही डिजिटल फसवणुकीला बळी पडलाय का?, 'या' पाच टिप्स फॉलो करून पुढील अनर्थ टाळा
  2. Tata Curvv ला क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग
  3. MOTORGLAZE कार केअर स्टुडिओचं चेंबूरमध्ये भव्य उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.