ETV Bharat / technology

मोबाईलवरून काही मिनिटांत जाणून घ्या तुमचं PF बॅलन्स, तुमचं EPFO पासबुक कसं तपासायचं?

मोबाईलवरून काही मिनिटांत तुम्ही तुमचं EPFO बॅलन्स घरबसल्या पाहू सकता. PF बॅलन्स कसं बघायचं चला जाणून घेऊया..

EPFO ​​passbook?
EPFO (Etv Bharat MH DESK)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 7, 2024, 1:20 PM IST

Updated : Oct 24, 2024, 12:21 PM IST

हैदराबाद : प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून काही रक्कम कापून त्यांच्या PF खात्यात जमा केली जाते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यात जमा झालेले पैसे बघायचं असतील, तर ते आता एका क्लिकवर ऑनलाईल पाहू शकतात. यासाठी आता तुम्हाला एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) च्या वेबसाइटवरसुद्धा जाण्याची गरज नाहीय. कारण तुम्ही उमंग ॲप्लिकेशनचा वापर करून तुमच्या PF खात्यात जमा झालेले पैसे पाहू शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडं फक्त युनिव्हर्सल अकाउंट नंबर असणं गरजेचं आहे.

उमंग ॲप : तुमच्या मोबाईलवर उमंग ॲप इन्स्टॉल करण्यासाठी, Google Play Store किंवा Apple App Store वर जा. "उमंग" शोधा, ॲप निवडा आणि "इंस्टॉल करा" वर टॅप करा. एकदा डाउनलोड केल्यानंतर, ॲप उघडा आणि नोंदणी करा.

काय आहे उमंग ॲप? : उमंग ॲपवर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) विविध सेवांचा लाभ एकाच ॲपमध्ये घेऊ शकता. हे ॲप Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करा. या ॲपवर आधार, राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), ABHA आरोग्य योजना तसंच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सारख्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना एकाच ठिकाणी पहाता येतात.

तुमचं पासबुक कसं तपासायचं :

  • सर्वप्रथम तुम्हाला उमंग ॲपमध्ये EPFO ​​शोधायचं आहे.
  • त्यानंतर View Passbook वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक टाकावा लागेल.
  • यानंतर तुम्ही Get OTP वर क्लिक करा आणि नंतर सबमिट OTP वर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा मेंबर आयडी निवडा आणि ई-पासबुक डाउनलोड करा.

असा पाहा EPFO ऑनलाइन ? : उमंग ॲपवर तुम्ही PF खात्यातील पैसे देखील काढू शकता. तसंच UAN नंबरसाठी तुम्हाला या ॲपवर अर्ज करता येतो. मिस्ड कॉल करूनही तुम्ही ईपीएफ खात्याची शिल्लक तपासू शकता. तुम्ही UAN साइटवर नोंदणीकृत असल्यास, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करून माहिती मिळवू शकता. तुमच्या UAN मध्ये तुमच्या बँक खात्याची माहिती, आधार आणि पॅन समाविष्ट असल्याची खात्री करा. तुमचं खातं EPFO नसल्यास तुमच्या कंपनीच्या व्यावस्थापकीय विभागाशी संपर्क साधा. त्यानं तुमचं खातं ओपन करण्याची विनंती करा.

  • अधिकृत EPFO ​​सदस्य पासबुक पोर्टलला (https://www.epfindia.gov.in/site_en/index.php) भेट द्या.
  • साइन इन करण्यासाठी तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्ड टाका.
  • तुम्हाला पहायचं असलेलं पीएफ खातं निवडा.
  • सर्व व्यवहारांसाठी पीएफ पासबुकवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमची शिल्लक दिसेल.

ईपीएफ ऑफलाइन कसा पाहावा :

तुमचा UAN तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरशी लिंक असल्यास, तुम्ही 7738299899 वर एसएमएस पाठवू शकता. येथे तुम्ही तुमची पसंतीची भाषा देखील निवडू शकता. संदेश पाठवल्यानंतर काही सेकंदात, तुम्हाला एसएमएसद्वारे तुमची ईपीएफ खात्यातील शिल्लक रकेमचा संदेश प्राप्त होईल.

मिस कॉल : मिस कॉलद्वारे जर तुमचा UAN नोंदणीकृत मोबाईल नंबरशी लिंक असेल, तर तुम्ही 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊ शकता. कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल. त्यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे तुमची ईपीएफाचा एक संदेश येईल. त्यात तुमच्या खात्याशी संबंधित माहिती असेल.

हे वाचलंत का :

  1. कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केली थेट लाभ हस्तांतरण योजना, EPFO साठी 3000 कोटींची घोषणा - Union Budget 2024
  2. करोडो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PF ठेवींवर मिळणार 'इतके' टक्के व्याज
  3. Mumbai Crime : पीएफ अकाउंटमध्ये 11 कोटी रुपये जमा झाल्याची मारली थाप, 71 वर्षीय वृद्धेला चार कोटींचा गंडा

Last Updated : Oct 24, 2024, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.