ETV Bharat / technology

मतदार कार्ड हवरलंय?, घरबसल्या 'असं' काढा मतदार ओळखपत्र; 'असा' करा ऑनलाइन अर्ज

How to Apply Voter ID Card : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ते कसं काढायचं जाणून घेऊया..

How to Apply Voter ID Card
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 7, 2024, 11:24 AM IST

Updated : Oct 16, 2024, 4:46 PM IST

हैदराबाद How to Apply Voter ID Card : निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होतील. झारखंडमध्ये 81 तर महाराष्ट्रात एकूण 288 जागांवर निवडणूक होणार आहे. जर तुम्ही या राज्यांमध्ये मतदान करणार असाल, तर तुमच्याकडं मतदान कार्ड असणं आवश्यक आहे. मात्र, तुमचं मतदानकार्ड हरवलं असेल, किंवा तुम्हाला नविन मतदान कार्ड काढायचं असेल तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करून अगदी सहज मतदान कार्ड काढू शकता.

मतदार कार्ड पात्रता : भारतात मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्राची गरज असते. याला इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड असे देखील म्हणतात. पण हे कार्ड हरवल्यावर काय करायचं? नवीन मतदान कार्ड कसं काढायचे? मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, त्यासाठी काय पात्रता लागते?, चला समजून घेऊया.

मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज : भारतासह अनेक देशांमध्ये लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. हा ओळखीचा पुरावा म्हणून देखील ग्राह्य धरला जातो. तसंच तुमचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या कार्डची गरज असते. त्यामुळं तुमच्याकडं मतदान कार्ड नसेल, तर तुम्ही ऑनलाइन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सुलभ झालीय. मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, याबाबत सर्व माहिती तुम्हाला आज आम्ही देणार आहोत.

काय आहे मतदार ओळखपत्र : भारतात प्रत्येकाला फक्त एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून (EPIC) मतदान ओळखपत्र दिलं जातं. या कार्डला जारी करण्याचे अधिकार फक्त निवडणूक आयोगालाचं आहेत. निवडणुकीत मतदान करण्यासाठी हे कार्ड महत्त्वपूर्ण आहे. यावर तुमची ओळख आणि पत्ता देखील असतो. केवळ पात्र नागरिकच मतदान करू शकतील, याची खात्री करण्यासाठी हे कार्ड निवडणूक प्रक्रियेदरम्यान वापरलं जातं. तसंच इतर सरकारी येजणांसाठी या कार्डचा वापर करता येतो.

पात्रता निकष : मतदार ओळखपत्राची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, तुम्ही खालील निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा:

नागरिकत्व : तुम्ही देशाचे नागरिक असणं आवश्यक आहे.

वय : सामान्यतः, निवडणुकीच्या तारखेला किंवा त्यापूर्वी तुमचं वय किमान १८ वर्षे असावं.

How to Apply Voter ID Card
अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया (Election Commission of India)

रेसिडेन्सी : तुम्ही मतदानासाठी अर्ज करत असलेल्या परिसरातील रहिवासी असणं आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज : मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया वापरकर्त्यांसाठी अनुकूल बनवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी या खाली देलेल्या माहितीचं अनुसरण करा.

How to Apply Voter ID Card
नोंदणी/लॉग इन करा (Election Commission of India)

1. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या :

भारतात, तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) https://eci.gov.in अधिकृत वेबसाइटला किंवा तुमच्या संबंधित राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) च्या वेबसाइटला भेट द्यावी.

2. नोंदणी/लॉग इन करा : तुम्ही नवीन वापरकर्ते असल्यास, तुम्हाला पोर्टलवर खाते तयार करून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे मूलभूत तपशील जसे की नाव, ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. तुम्ही आधीच नोंदणीकेल्यास, फक्त लॉग इन करा.

How to Apply Voter ID Card
अर्जाचा प्रकार निवडा (Election Commission of India)

3. अर्जाचा प्रकार निवडा : नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी किंवा विद्यमान एखादे अपडेट करण्यासाठी पर्याय निवडा. प्रथमच नवीन मतदार ओळखपत्रासाठी नवीन कार्डसाठी पर्याय निवडा.

4. अर्ज भरा : सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुरवात करा:

वैयक्तिक माहिती : पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग इ. लिहा

पत्ता : तुमचा सध्याचा निवासी पत्ता तिथं टाका.

ओळख, पुरावा : तुमची ओळख आणि पत्ता सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांचा तपशील, जसे की आधार कार्ड, पासपोर्ट किंवा युटिलिटी बिल्याची माहिती द्या.

5. कागदपत्र अपलोड करा : आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. यात ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट इ.), पत्त्याचा पुरावा (युटिलिटी बिल, भाडे करार इ.) अलीकडील पासपोर्ट आकाराचं छायाचित्र.

6. तपासून सबमिट करा : तुम्ही भरलेला माहितीची पुन्हा एकदा तपासणी करावी. तसंच अपलोड केलेल्या कागदपत्राची पडताळणी करावी. सर्व माहिती बरोबर असल्यासं अर्ज सबमिट बटनावर क्लिक करा.

7. तुमच्या अर्जाची स्थिती : सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला संदर्भ क्रमांकासह (Electoral Roll) पोचपावती मिळेल. वेबसाइटवर तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी पावती नंबरचा वापर करा.

8. मतदार ओळखपत्र प्राप्त करा : एकदा तुमच्या अर्जावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्हाला तुमचं मतदार ओळखपत्र तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर प्राप्त होईल. तसंच तुम्ही स्टेटस अपडेट तपासू शकता किंवा ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकता.

अडचणी-उपाय :

चुकीची माहिती : सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जात काही त्रुटी आढळल्यास, तुम्ही स्थानिक निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे त्या दुरुस्त करू शकता.

दस्तऐवज नाकारणे : अपलोड केलेले सर्व कागदपत्र तपासून पहावे. वेबसाइटवर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याची खात्री करा. आवश्यक असल्यास पुन्हा अपलोड करा.

प्रक्रियेत विलंब : प्रदेश तसंच आयोगातील कार्यलयाच्या प्रक्रियेमुळं तुम्हा मतदार ओळखपत्र मिळण्यास विलंब लागू शकतो. अधिक विलंब झाल्यास, स्थानिक निवडणूक कार्यालयाकडं पाठपुरावा करा.

मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करणे ही एक सोयीस्कर प्रक्रिया आहे, जी वेळ आणि श्रम वाचवते. वर दिलेल्या माहितीचं पालन करून, तुमचा अर्ज योग्यरित्या सबमिट केल्यास मतदार ओळखपत्र तुम्हाला मिळेल. मतदार ओळखपत्र असणं हे केवळ आपलं कर्तव्यच नाही, तर तुम्हाला लोकशाही प्रक्रियेचा एक भाग बनण्याचं सामर्थ्य देखील देतं. नवीनतम माहिती नेहमीनिवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटचा किंवा तुमच्या स्थानिक निवडणूक कार्यालयाशी संपर्क करावा.

'हे' वाचलंत का :

  1. घरबसल्या 10 मिनिटांत काढा मोफत ई पॅन कार्ड, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया - E Pan Card
  2. Jio च्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त बंपर ऑफर, ऑफर मर्यादित कालावधीसाठी - Jio Anniversary Offers 2024
  3. वीज बिल जास्त येतयं? आता काळजी कशाला करता, 'या' टिप्स फॉलो करून करा विजेसह पैशाची बचत - Save money save electricity

Last Updated : Oct 16, 2024, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.