हैदराबाद Honor 200 Lite 5G : Honor आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनीनं आपल्या आगामी स्मार्टफोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. कंपनी भारतात Honor 200 Lite 5G फोन लाँच करणार आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत 19 सप्टेंबर रोजी लॉन्च केला जाईल. जो तुम्ही Amazon आणि Honor च्या e-store वरून खरेदी करू शकाल. लॉन्चपूर्वी कंपनीनं काही स्पेक्सची माहितीही शेअर केली आहे. हा फोन मजबूत कॅमेरा वैशिष्ट्यांसह येईल. मात्र फोनच्या किमतीबाबत अद्याप काही माहिती समोल आलेली नाहीय. कंपनीची यापूर्वीची अनेक उत्पादनं लोकप्रिय झालेली नाहीय.
काय असेल विशेष? : Honor 200 Lite 5G च्या माध्यमातून कंपनी काहीतरी नवीन ग्राहकांना फिचर उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन 19 सप्टेंबर रोजी लॉन्च केला जाईल. ज्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग ब्रँडच्या सोशल मीडिया हँडलवर तुम्हाला पहाता येईल. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, जो आयताकृती मॉड्यूलमध्ये येईल. यात 108MP प्राथमिक कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि मॅक्रो कॅमेरा उपलब्ध असेल. समोर, कंपनी 50MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते. Honor 200 Lite 5G चं वजन 166 ग्रॅम असेल. हा त्यांच्या सिरिजमधील सर्वात स्लिम आणि हलका फोन असू शकतो.
काय असतील स्पेसिफिकेशन्स? : कंपनीनं आधीच जागतिक बाजारपेठेत HONOR 200 Lite 5G लाँच केले आहे. एप्रिलमध्ये लॉन्च झालेल्या या फोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Magic OS 8 वर काम करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरसह येतो. यात 108MP + 5MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. समोर कंपनीनं 50MP चा कॅमेरा दिला आहे. सुरक्षेसाठी, स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 4500mAh बॅटरी आहे, जी 35W चार्जिंगला सपोर्ट करते.
हे वाचलंत का :