ETV Bharat / technology

Honda Cars ने सादर केला नवा वॉरंटी प्रोग्राम, जाणून घ्या फायदे - HONDA CAR WARRANTY PROGRAM

Honda Cars India : Honda Cars नं त्यांच्या निवडक मॉडेल्ससाठी एक नवीन विस्तारित वॉरंटी प्रोग्राम सुरू केलाय. ज्यामध्ये 7 वर्षे/अमर्यादित किमी वॉरंटी दिली जात आहे.

Honda Cars
Honda Cars (Honda)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 10, 2024, 3:52 PM IST

हैदराबाद Honda Cars India : Honda Cars India नं त्यांच्या निवडक मॉडेल्ससाठी नवीन विस्तारित वॉरंटी कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, ग्राहक खरेदीच्या तारखेपासून सात वर्षांपर्यंत त्यांची वॉरंटी वाढवू शकतात. शिवाय, या कालावधीत कव्हर केलेल्या किलोमीटरवर कोणतीही मर्यादा देण्यात आलेली नाही.

Honda Elevate
Honda Elevate ((फोटो - Honda Cars India))

कंपनीनं सांगितले की, ही विस्तारित वॉरंटी तिच्या सध्याच्या मॉडेल रेंजच्या पेट्रोल आवृत्त्यांवर दिली जात आहे. ज्यात Honda Elevate, City, City e:HEV आणि Amaze यांचा समावेश आहे. याशिवाय या विस्तारित वॉरंटीमध्ये Honda Civic, Jazz आणि WR-V सारख्या इतर मॉडेल्सच्या पेट्रोल आवृत्त्यांचाही समावेश आहे.

Honda Cars India
होंडा एलिव्हेटचे आतील भाग (Honda Cars India)

जर ग्राहकानं आधीच विस्तारित वॉरंटी कार्यक्रमासाठी नोंदणी केली असेल, तरच हे पॅकेज लागू होईल. Honda च्या विस्तारित वॉरंटी कार्यक्रमाच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अमर्यादित किलोमीटरची पॉलिसी, सात वर्षांचं कव्हरेज, देशव्यापी सेवा नेटवर्क आणि या कालावधीत वाहन विक्रीवर वॉरंटी हस्तांतरण यांचा समावेश आहे.

Honda
होंडा एलिव्हेट (Honda Cars India)

Honda Cars India नं गेल्या महिन्यातच त्यांच्या Honda Elevate चं Apex Edition लाँच केलं होतं. ज्याची किंमत 12.68 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कंपनीनं या स्पेशल एडिशनमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल केले आहेत. ज्यामुळं ते रेग्युलर व्हेरियंटपासून वेगळं केलं जाऊ शकतं.

मात्र, त्यात यांत्रिकपणं कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या SUV मध्ये 1.5-लीटर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. जे 120 bhp पॉवर आणि 145 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करतं. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7-स्पीड CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.