हैदराबाद New 2024 Honda Amaze : आघाडीची कार उत्पादक Honda Cars India 4 डिसेंबर रोजी भारतात तिसरी आवृत्ती कॉम्पॅक्ट सेडान Amaze लाँच करणार आहे. याआधी, कंपनीनं आपल्या फेसबुक सोशल मीडिया हँडलवर या आगामी कारचं स्केच जारी केलं आहे. नवीन अमेझच्या आतील आणि बाहेरील भागात मोठे बदल होणार आहेत. तथापि, इंजिनमध्ये कोणतेही बदल होण्याची शक्यता नाहीय. नुकत्याच लाँच झालेल्या 2024 मारुती डिझायर सेगमेंटमध्येसह ती Hyundai Aura आणि Tata Tigor सारख्या कारशी स्पर्धा करेल.
The Honda Amaze legacy lives on. With every generation, it has set a new standard in style & sophistication. Now, as we gear up for the third generation, excitement is at an all-time high. Stay tuned – a bold new chapter is about to begin.#AmazeSketchReveal #HondaCarsIndia pic.twitter.com/PXFYnbkGTR
— Honda Car India (@HondaCarIndia) November 11, 2024
2024 होंडा अमेझ इंटिरियर : इंटीरियरबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन Honda Amaze ला ड्युअल-टोन, सुधारित डॅशबोर्ड मिळतो, ज्यामध्ये फ्री-स्टँडिंग इन्फोटेनमेंट सिस्टम आणि आयताकृती एसी व्हेंट्स आहेत. तसंच उजव्या बाजूला टच-कॅपेसिटिव्ह बटणे आणि लहान स्क्रीनसह HVAC पॅनेल आहे. या सेडानमध्ये नवीन थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील माउंट केलेलं नियंत्रणं, तसंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बेज सीट अपहोल्स्ट्री आहे.
2024 होंडा अमेझ वैशिष्ट्ये : 2024 Honda Amaze च्या फीचर्सची माहिती अजून समोर आलेली नाही, पण यात वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, 12V पॉवर आउटलेट आणि बरेच काही मिळण्याची शक्यता आहे. Honda नवीन Amaze ला ADAS (Advanced Driver Assistance System) तंत्रज्ञानानं सुसज्ज असेल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.
2024 होंडा अमेझ डिझाइन : डिझाईन आणि लुकबद्दल बोलायचं झालं तर नवीन अमेझमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याची पुढची फॅसिआ ग्लोबल-स्पेक सिव्हिकनं प्रेरित आहे. यामध्ये हनीकॉम्ब पॅटर्न, स्लीकर एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प्स, अपडेटेड फ्रंट आणि रीअर बंपर, नवीन रीअर स्पॉयलर आणि शार्क-फिन अँटेना असलेली नवीन ग्रिल दिसेल. नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्सही यामध्ये पाहायला मिळतात.
2024 होंडा अमेझ पॉवरट्रेन : याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होणार नाही, सध्याच्या मॉडेलचे 1.2L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन यात मिळेल. ही 4-सिलेंडर मोटर 90bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्स उपलब्ध असतील.
हे वाचलंत का :