ETV Bharat / technology

अन्न पॅकेजिंगमुळे स्तनाचा कर्करोग, अभ्यासात कर्करोगाशी संबंधित 200 रसायनं आढळी - BREAST CANCER

author img

By ETV Bharat Health Team

Published : 2 hours ago

BREAST CANCER : एका संशोधनात फूड पॅकेजिंगमध्ये स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित 200 रसायनं आढळून आली. फ्रंटियर्स इन टॉक्सिकोलॉजीमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं असून फूड पॅकेजिंगमध्ये प्रतिबंधात्मक उपाय करण गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

BREAST CANCER
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat File Photo)

नवी दिल्ली BREAST CANCER : प्लॅस्टिक, कागद तसंच स्ट्रॉसह खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये जवळपास 200 संभाव्य स्तन कर्करोगाची रसायने ओळखण्यात संशोधकांना यश आलं आहे. फ्रंटियर्स इन टॉक्सिकोलॉजीमध्ये मंगळवारी प्रकाशित झालेल्या निष्कर्षात अन्न उत्पादनांमधील रसायने कमी करण्यासाठी मजबूत प्रतिबंधात्मक उपायांची करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

अन्न पॅकेजिंगमुळं कर्करोग : "हा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण, स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत असलेल्या रसायनांच्या मानवी प्रदर्शनास प्रतिबंध करण्याची मोठी संधी आहे, असं " फूड पॅकेजिंग फोरमचे व्यवस्थापकीय संचालक जेन मुन्के यांनी म्हटलंय. "तुमच्या दैनंदिन जीवनात हानिकारक रसायने कमी करून कर्करोग रोखण्यावर अधिक लक्ष देण्यास देण्याची गरज" असल्याचं देखील जेन मुन्के म्हटंलय.

2.3 दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग : स्तनाचा कर्करोग हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा महिलांमध्ये प्रथम क्रमांकाचा कर्करोग आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2022 मध्ये, 2.3 दशलक्ष महिलांना स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालंय. जगभरात 6 लाख 70 लोकांचा मृत्यू कर्करोगानं झालाय.

प्लास्टिकमुळं 143 कर्करोगाची प्रकरण : यावेळी संशोधकांनी संभाव्य स्तन कर्करोगाच्या प्रकरणांची तुलना पूर्वी प्रकाशित केलेल्या डेटाशी केली. तेव्हा त्यांना आढळलं की 189 संभाव्य स्तन्य कर्करोग अन्नातील (FCMs) कागदामध्ये 89 तसंच प्लास्टिकमध्ये 143 कर्करोगाची प्रकरण आढळून आलीय.

स्तन कर्करोगाचे पुरावे : हा अभ्यास 2020-2022 दरम्यान करण्यात आलाय. यावेळी संशोधकांना जगभरात खरेदी केलेल्या FCM मध्ये 76 संशयित स्तन कर्करोगाचे पुरावे देखील आढळले. त्यापैकी 61 (80 टक्के) प्लास्टिकचे कणाचे पुरावे मिळाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांत EU आणि US सह उच्च नियमन केलेल्या प्रदेशांमधील बाजारांमधून असं अन्न साहित्य खरेदी केलं गेलंय. अन्नात FCM कार्सिनोजेनिक पदार्थाचा वापर कमी करण्याचा असूनही या आभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर आलंय. "आमचे संशोधनातील निष्कर्ष संपूर्ण लोकसंख्येतील अन्नापासून FCMs स्तन कर्करोगाचे व्यापक पुरावे दर्शवत आहेत, असं या संशोधनाच्या लेखकांनं सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.