ETV Bharat / technology

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल 'या' तारखेपासून सुरू, 80% पर्यंत मिळणार सूट - Flipkart Big Billion Days 2024 - FLIPKART BIG BILLION DAYS 2024

Flipkart Big Billion Days 2024 : तुम्ही फ्लिपकार्टच्या आगामी बिग बिलियन डेज सेलची वाट पाहताय का? तुमच्यासाठी ई-कॉमर्स फ्लिपकार्ट कंपनीनं 2024 च्या बिग बिलियन डेज सेलची तारीख जाहीर केलीय.हा सेल फक्त फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल. त्यामुळं तुम्ही जर, फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य नसाल तर तुम्हाला फ्लिपकार्ट प्लसचं सदस्यत्व कसं मिळवायचं, बिग बिलियनं डेज सेलं कधी असणार याबाबत माहिती देणार आहोत.

Flipkart Big Billion Days sale starts
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 5, 2024, 1:54 PM IST

हैदराबाद Flipkart Big Billion Days 2024 : लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart नं बिग बिलियन डेजची तारीख जाहीर केली आहे. हा सेल फ्लिपकार्टचा सर्वात मोठा सेल म्हणून ओळखला जातो. या सेलमध्ये अनेक ब्रँड, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देणार आहेत. एवढंच नाही तर बिग बिलियन डेज सेलमध्ये ग्राहक विनाशुल्क EMI शिवाय वस्तू खरेदी करू शकतील.

4K टीव्हीवर 75 टक्क्यांपर्यंत सूट : फ्लिपकार्टवर विक्रीसाठी तयार केलेल्या मायक्रोसाइटनुसार, ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीजवर 80 टक्के सूट मिळू शकते. तुम्ही टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, तुम्हाला 4K टीव्हीवर 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकते.

iPhone 15 आणि iPhone 14 मिळणार सवलत : इतकंच नाही तर iPhone 15 आणि iPhone 14 ची किंमत देखील Flipkart Big Billion Days सेलमध्ये कमी असण्याची शक्यता आहे. Samsung, Redmi, Xiaomi, Realme, OnePlus यांसारख्या ब्रँड्सच्या फोनवर उत्तम सूट मिळू शकतो. फ्लिपकार्ट EMI, बँक ऑफर, कॅशबॅक, कूपनसह इतर पर्याय देखील ऑफर करण्याची शक्यता आहे. यासोबतच फ्लिपकार्ट सेलमध्ये लॅपटॉप, टॅबलेट, इअरबड्स, हेडफोन, स्मार्टवॉच असं बरंच काही स्वस्त किमतीत उपलब्ध असेल.

फ्लिपकार्ट प्लस सदस्यत्व कसं मिळवायचं : Flipkart Plus साठी ग्राहकांनी गेल्या 365 दिवसांत 4 यशस्वी व्यवहार केले असावेत. Flipkart Plus Premium साठी, तुम्ही मागील 365 दिवसांत 8 यशस्वी व्यवहार केले असावेत. त्यानंतर Flipkart Plus ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर 2x सुपरकॉइन्स मिळणार आहेत.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल डेट : फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी 29 सप्टेंबर 2024 रोजी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू होईल. ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर 2x सुपर कॉइन्स देखील मिळतील.

हे वाचलंत का :

  1. वीज बिल जास्त येतयं? आता काळजी कशाला करता, 'या' टिप्स फॉलो करून करा विजेसह पैशाची बचत - Save money save electricity
  2. घरी एलपीजी गॅसवर स्वयंपाक करता? स्वयंपाक करताना पाळा 'हे' महत्त्वाचे नियम - LPG gas
  3. 'हे' 5 सेफ्टी गॅजेट्स करणार महिलांची सुरक्षा - Women Safety Gadgets

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.