ETV Bharat / technology

फेसबुकसह इन्स्टाग्राम बंद झाल्यानं वापरकर्त्यांचा संताप, मेटाच्या प्रवक्त्याकडून एक्स सोशल मीडियावर दिलगिरी - फेसबुक बंद

Facebook Instagram Down: मंगळवारी रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा खंडित झाली होती. त्यावर 'मेटा'चे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेटाच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्या सोडण्यात आली आहे. युजर्सला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

Facebook Instagram Down
Facebook Instagram Down
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 8:27 AM IST

कॅलिफोर्निया Facebook Instagram Down : मेटाच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्यांमुळं फेसबुक आणि इन्स्टाग्राम युझर्सला काही काळ त्रास सहन करावा लागला. भारतासह जगभरातील मेटा युझर्सला खाती आपोआप लॉग आउट झाली. यानंतर युजर्सला अकाऊंट लॉग इन करण्यात त्रास झाला. त्याचा परिणाम मेटाच्या मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सॲपवर दिसलेला नाही. यावर मेटाचे प्रवक्ते, अँडी स्टोन यांनी प्रतिक्रिया दिली. "मेटाच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्येचं निराकरण करण्यात आलंय," असं त्यांनी म्हटलं आहे.

युजरच्या गैरसोयीबद्दल व्यक्त केली दिलगिरी : मेटावरील तांत्रिक समस्येची जाणीव असल्याचं सांगून त्यांनी स्पष्ट केलं की, "सोशल मीडिया युजर्सच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. 'X' या सोशल साइटवर स्टोननं लिहिलं, "एका तांत्रिक समस्येमुळं लोकांना आमच्या काही सेवा वापरण्यात अडचण येत होती. त्यामुळं आम्ही शक्य तितक्या लवकर तांत्रिक समस्येचं निराकरण केलंय. युजर्सच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत," असं त्यांनी म्हटंलय.

सेवा पूर्वपदावर : मंगळवारी संध्याकाळी, जगभरातील सोशल मीडिया युझर्सला फेसबुक, इंस्टाग्रामसह अनेक मेटा प्लॅटफॉर्मवर मोठ्या तांत्रिक समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळं अनेक युजर्सनं 'X' वर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. त्यांना फेसबुक आणि इन्स्टाग्राम लॉग इन करता येत नव्हतं. फेसबुक, इंस्टाग्रामवरील युझर्सला भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री 8.30 वाजता या समस्यांचा सामना करावा लागला. त्यावर मेटाचे प्रवक्ते, अँडी स्टोन यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला माहित आहे की," लोकांना आमच्या फेसबुक, इंस्टाग्रामसह अनेक मेटा प्लॅटफॉर्म सेवांमध्ये लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. सध्या आम्ही त्यावर काम करत आहोत," असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर फेसबुकसह इन्स्टाग्राम सुरू झाल्यानंतर जगभरातील कोट्यावधी युझर्स निश्चिंत झाले. मात्र, मेटाच्या प्रवक्त्याला दिलगिरी व्यक्त करण्याकरिता एक्स या सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. यावरून काही युझरनं मेटाच्या प्रवक्त्याला ट्रोल केलं.

हे वचालंत का :

जगभरात मेटाची सेवा ठप्प, एक्सवर मीम्सचा धुमाकूळ; काय होतात परिणाम

फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन; नेटकरी चिंतेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.