ETV Bharat / technology

तुम्ही डिजिटल फसवणुकीला बळी पडलाय का?, 'या' पाच टिप्स फॉलो करून पुढील अनर्थ टाळा

Digital Fraud : तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल फसवणुकीचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, तुम्ही पाच टिप्सचं पालन करून तुमची पुढील होणारी फसवणूक टाळू शकता.

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 3 hours ago

Digital Fraud
डिजिटल फसवणूक (AI)

मुंबई Digital Fraud : डिजिटल पेंमेंटमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसतेय. सणासुदीचा हंगाम खरेदीदारांसाठी खूपच महत्वाचा असतो. कारण या काळात आपण विविध वस्तूंची खरेदी करत असतो. त्यामुळं आपली फसवणूक होण्याची शक्यता देखील दाट असते. डिजिटल पेमेंट करणाऱ्या खरेदीदारांना यावेळी सायबर गुन्हेगार टार्गेट करतात. मात्र, तुमची फसवणूक झाल्यात त्यातून बाहेर कसं पडायचं? डिजिटल व्यवहार करताना फसवणूक टाण्यासाठी काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया..

1. अधिकृत ग्राहक सेवा सेवांवर कॉल करा : डिजिटल व्यवहार करताना तुमची फसवणूक झाल्यास ऑनलाईल ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करण्यात वेळ वाया घालवू नका. कारण तिथं दिलेले नंबर खोटे असू शकतात. अधिकृत नंबरवर फोन करून तुम्ही तुमचं खातं गोठण्याची विनंती करा, किंवा तुमचं कार्ड ब्लॉक करा. खातं किंवा कार्ड ब्लॉक केल्यानंतही व्यवहार होत असल्यास तुम्हाला परतावा मिळण्याची शक्यता असते.

2. विलंब न करता तक्रार करा : बँक आणि नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनवर (डायल 1930) फोन करून तत्काळ तक्रार करा. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) किंवा तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनवर तक्रार नोंदवून एक प्रत तुमच्याकडं ठेवा.

3. प्रत्येक तपशील दस्तऐवजीकरण करा : फसवणूक झाल्यानंतर घाबल्यामुळं महत्त्वाच्या तपशीलांकडं दुर्लक्ष होतं. त्यामुळं तुमचे तपशील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हाही तुम्हाला काहीतरी चुकीचं असल्याची शंका येईल तेव्हा सर्वकाही दस्तऐवजीकरण करा. संभाषण रेकॉर्ड, स्क्रीनशॉट, संदेश कॉपी, इ. तसंच, तुम्ही स्कॅमरशी शेअर केलेले व्यवहार आयडी, तारखा, रक्कम इ. जतन करून ठेवा. पोलिसांना माहिती देताना वरील तपाशिल महत्वाचा असतो. याच आधारे पोलीस तुमच्या गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास करतात.

4. पासवर्ड बदला : तुम्ही विविध ठिकाणी वापरलेले पासवर्डमध्ये बदल करा. तसंच असा पासवर्ड कोठेही लिहून ठेऊ नये. इतरांना कळणार नाही, अशा ठिकाणीच पासवर्डची नोंद करा. अँटी मालवेअरमुळं तुमचं डिव्हाइस नियमितपणे स्कॅन होतं. त्यामुळं एकदा तुम्ही ते चालू केल्यावर, मजबूत सुरक्षा उपायांसह अँटी मालवेअर फोनमध्ये इन्स्टॉल करा.

5. सुरक्षा टिपासह नागरिकांशी शेअर करा : डिजिटल पेमेंट व्यवहाराला कोणीही सहज बळी पडू शकतं. त्यामुळं तुमचे अनुभव मित्र, कुटुंब, वडील आणि सोशल मीडियावर आवश्यक सुरक्षा टिपासह नागरिकांशी शेअर करा. तुम्ही काय चूक किंवा बरोबर केलं, ते तिथं सांगा जेणेकरून त्यामुळं नागरिक शिक्षित होऊ शकतील.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात आपण काळजी घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी मोबाईलचा योग्य वापर आपण करायला हवा. तसंच तुम्हाला आलेले फसणुकीचे अनुभव तुम्ही इतरांशी शेअर केल्यामुळं एक सुरक्षित डिजिटल इकोसिस्टम विकसित होऊ शकते.

हे वाचलंत का :

  1. MOTORGLAZE कार केअर स्टुडिओचं चेंबूरमध्ये भव्य उद्घाटन
  2. JioBharat V3 आणि V4 4G फीचर फोन लॉंच, स्वस्त इंटरनेट डेटाचा मिळतोय लाभ
  3. Realme P1 Speed ​​5Gसह Techlife Studio H1 हेडफोन लॉन्च, रेनवॉटर स्मार्ट टच फीचर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.