हैदराबाद CTET Admit Card 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच CTET प्रवेशपत्र 2024 जारी करणार आहे. प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यावर CBSE CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वरून तुम्ही डाउनलोड करू शकता. “परीक्षेच्या तारखेच्या 2 दिवस आधी प्रवेशपत्र जारी केलं जाणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://ctet.nic.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड (ctet admit card download) करावं,” असं CBSE नं सांगितलंय.
CTET परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी : प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख (cbse ctet admit card ) आणि वेळ बोर्डानं अद्याप जाहीर केलेली नाही. या वर्षी CTET परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. कोणत्याही शहरात (ctet admit card 2024 exam city) जास्त उमेदवार असल्यास, 15 डिसेंबर 2024 रोजी देखील परीक्षा घेतली जाऊ शकते.
दोन शिफ्टमध्ये परीक्षा : या परीक्षेत दोन पेपर असतील आणि परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होईल. पेपर II हा सकाळच्या शिफ्टमध्ये आणि पेपर I संध्याकाळच्या शिफ्टमध्ये होईल. दोन्ही स्तरांसाठी (इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी) शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना दोन्ही पेपरमध्ये (पेपर I आणि पेपर II) उपस्थित राहावं लागेल. प्रश्नपत्रिका द्विभाषिक- हिंदी/इंग्रजी माध्यामात असेल.
CTET प्रवेशपत्र 2024 कसं डाउनलोड करावं? :
उमेदवार खाली दिलेल्या प्रक्रियेचं पालन करून CTET प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.
- अधिकृत वेबसाइटला https://ctet.nic.in भेट द्या.
- प्रवेशपत्राच्या लिंकवर जा.
- लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
- CTET हॉल तिकीट 2024 डाउनलोड करा.
- त्याची प्रिंटआउट घ्या.
- लवकरच CTET.NIC.IN 2024 प्रवेशपत्र डाउनलोड लिंक उपलब्ध होणार आहे.
हे वाचलंत का :
CAT 2024 चा निकाल लवकरच जाहीर होणार, निकाल लागण्यापूर्वीच महाविद्यालयाचा शोध सुरू